आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या मदतीने आई-वडील, भावासह स्वतःच्या कुटुंबातील 8 जणांची केली होती हत्या, आता तिनेच जेलमध्ये केले असे कांड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोनिया या महिलेने स्वतःच्याच कुटुंबातील 8 जणांची हत्या केली होती. त्यात तिने आई-वडिलांसह, भाऊ तसेच लहान मुलांचा समावेश ङोता. त्यात महिलेने आता जेलमध्ये असे कांड केले आहे की, पोलिसही धक्क्यात आहेत. 8 जणांच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारी सोनिया हिने कुरूक्षेत्र तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हिसारच्या माजी आमदार विधायक रेलू राम पुनिया यांची ती मुलगी आहे. येथील महिला कर्मचाऱ्यांनी तिला वाचवले. 


सोनियाने तुरुंगामध्ये साडीचा फास बनवत एका स्टूलवर चढून पंख्याला लटकण्याचा प्रयत्न केला. इतर कैदी महिलांनी त्याला पाहिले आणि गोंधळ केला. त्याचवेळी वॉर्डन तेथे आली आणि तिने लगेचच महिलेला वाचवले. या घटनेमुळे तुरुंग प्रशासनात गदारोळ उडाला आहे. तुरुंग प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपावर तिला करनाल तुरुंगात पाठवले आहे. तिच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 


तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुरुक्षेत्र तुरुंगात आल्यापासून सोनिया विचित्रपणे वागत होती. इतर कैदी महिलांशी ती भांडण मारहाण करायची. गेल्या महिन्यातही तिने मारहाणकेली होती. पोलिसांनी तिच्या विरोधात कलम 323, 324 अंतर्गत गुन्हादेखिल दाखल केला होता. 


पती पॅरोलवर गेला आणि फरार झाला 
हत्याकांडात सोनियाबरोबर सहभागी अशलेला तिचा पती पती संजीवदेखिल कुरुक्षेत्र तुरुंगात होता. तोही अनेकांना त्रास देत होता. तीन महिन्यांपूर्वी तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर गेला होता. पण नंतर तो परतलेला नाही. दोन पथके त्याला शोधण्यासाठी फिरत आहेत. 


2001 मध्ये केल्या होत्या 8 हत्या 
सोनिया आणि संजीवने 2001 मध्ये कुटुंबातील 8 नातेवाईकांची हत्या केली होती. लहान मुलांना तर आपटून आपटून मारले होते. न्यायालयाने त्यांना फाशी सुनावली. सुप्रीम कोर्टातही फाशी कायम राहिली. नंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका सादर केली असता राष्ट्रपतींनी शिक्षा बदलून जन्मठेप केली. 

बातम्या आणखी आहेत...