आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाच्या शेवटच्या कोपऱ्यात वसलेले शहर, फोटोंच्या माध्यमातून पाहा येथील LIFE

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - ही छायाचित्रे पृथ्वीच्या सर्वात दक्षिण दिशेला असलेल्या टिएरा डेल फ्युगो बेटाची आहेत. हे बेट चिली आणि अर्जेंटीना यांत विभागलेले आहे. धरतीच्या सर्वात शेवटच्या किनाऱ्यावर वसलेले हे बेट जगापासून वेगळे आहे. बेल्जियन फोटोग्राफर ब्रिट वाँगेचतेन येथे आपल्या मास्टर प्रोजेक्टसाठी गेले होते. त्याचवेळी त्यांनी काही क्षण आणि येथील लोकांची दैनंदिनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. यासोबतच, फोटोग्राफर मारियो तामा यांनी देखील राजधानी उशुआइयाचे नजारे कैद केले आहेत.

 

असे जगतात येथील स्थानिक
- ब्रिट 'एल फिन डेल मुंडो' प्रोजेक्टसाठी 2012 मध्ये टिएरा डेल फ्यूगो आयलंडवर गेले होते. ते चिलीच्या हद्दीतील भागात गेले होते. त्या ठिकाणी अर्जेंटीनाच्या दिशेने राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे. फोटोग्राफरचे क्रेडिट कार्ड तेथे ब्लॉक झाले होते. डेबिट कार्ड काम करत नव्हते. त्यावेळी ब्रिट यांनी फक्त 120 युरोंमध्ये 5 दिवस काढले. टिएरा डेल फ्यूगोवर 1,27,205 लोकसंख्या असलेले प्रांत अर्जेंटीनाच्या ताब्यात आहे. पृथ्वीचे शेवटचे कोपरे म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी लोक अतिशय कठिण परिस्थितीत जगतात.
- हा परिसर डोंगर, बीच आणि ग्लेशियरने व्यापलेले आहे. कडाक्याच्या थंडीत बर्फाचे वादळ येथे रोजचीच गोष्ट बनले आहे. पर्यटकही या बेटावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था कमकुवत असल्याने ते राजधानी किंवा मोठ्या शहरांमध्येच राहून निघून जातात. उशुआइयाची दैनंदिन लाइफ कव्हर करणारा फोटोग्राफर तामा याने सांगितल्याप्रमाणे, लोकांना साधे पाणी पिण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. पर्यटक या ठिकाणी क्रूझ शिपने येतात. त्यामध्ये येणारे क्रू आणि प्रवासी प्रदूषणासह कचरा सुद्धा वाढवतात.

 

बातम्या आणखी आहेत...