आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर येथे होती तनुश्री दत्ता, सख्ख्या बहिणीच्या लग्नालाही मारली होती दांडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'आशिक बनया आपने'ची अॅक्ट्रेस तनुश्री दत्ता तुम्हाला आठवते का? जर आठवत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, की 2004 मध्ये मिस यूनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर तनुश्री दत्ताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. 2005 मध्ये तिचा पहिला चित्रपट आला होता 'आशिक बनाया आपने'. यामध्ये तनुश्रीने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. फिल्म यशस्वी देखील ठरली होती, मात्र तनुश्रीचे करिअर काही यशस्वी राहिले नाही. रुपेरी पडद्यावर ती शेवटची दिसली ती 2010 मध्ये प्रदर्शित 'अपार्टमेंट'मध्ये. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर 2012 मध्ये तिचे एक बोल्ड फोटोशूट समोर आले होते. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. गेल्या 8 वर्षांपासून तनुश्री फिल्म आणि ग्लॅम वर्ल्डपासून दूर यूएसमध्ये होती. आती ती भारतात परतली असून येथे येताच तिने एक धक्कादायक आणि तितकाच खळबळजनक खुलासा केला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तिने गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे. नाना यांच्यामुळेच सिनेसृष्टीतील करिअर संपुष्टात आले असल्याचे ती म्हणाली आहे. अलीकडेच झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने नानांवर अनेक धक्कादायक आरोप लावले आहे.

 

'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर त्यांनी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, तेथे उपस्थित होत हे सर्व बघत होते, पण कुणीही आपल्या मदतीसाठी पुढे सरसावे नाही, असे ती म्हणाली. इतकेच नाही तर नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. इंडस्ट्रीतील सगळ्यांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही, असेही तनुश्री पुढे म्हणाली आहे.

 

सिनेसृष्टीत पदार्पणाच्या वेळी तनुश्रीचा ग्लॅमरस लूक अनेकांना भूरळ घालणारा होता. पण गेल्या आठ वर्षांत तिच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. आता ती पुर्वीसारखी ग्लॅमरस दिसत नाही. एवढ्या वर्षांत ती नेमकी कुठे होती, एवढी वर्षे तिने काय केले, याचा खुलासा काही दिवसांपूर्वी तिची धाकटी बहीण इशिता दत्ता हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केला होता. काय म्हणाली होती इशिता टाकुयात यावर एक नजर... 

बातम्या आणखी आहेत...