आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arun Jaitley, Arun Jaitley Death: Former Finance Arun Jaitley Driver Children Study In Same School

आठवणीतले जेटली / ज्या ठिकाणी अरुण जेटलींची मुले शिकत होती, त्याच ठिकाणी आपल्या ड्रायव्हर कुकच्या मुलांनाही शिकवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - एका हाताने मदत करावी आणि दुसऱ्या हातालाही कळू नये... गुप्तदान हेच खरे दान असते. दिवंगत नेते अरुण जेटली यांचा स्वभावही काही असाच होता. जेटलींनी वैयक्तिक आयुष्यात आपल्या स्टाफचीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांची आणि मुलांची सुद्धा अगदी आपुलकीने काळजी घेतली. स्टाफला ते आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानत होते. त्यामुळेच, कर्मचारी सुद्धा त्यांची आपुलकीने काळजी घ्यायचे. त्यांना वेळेवर डायट देणे असो वा औषधी... प्रत्येक गोष्टीवर कर्मचाऱ्यांचे बारकाइने लक्ष राहायचे...

जेटलींनी एक अघोषित नियम लागू केला होता. त्यानुसार, त्यांच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांची मुले-मुली चाणक्यपुरी येथील कार्मल काँव्हेंट शाळेत शिकायचे. याच शाळेत स्वतः जेटलींचा मुलगा आणि मुलगी शिकले. एवढेच नव्हे, तर स्टाफपैकी कुणाचाही मुलगा किंवा मुलगी परदेशात शिकण्यास इच्छुक असेल तर त्याची जबाबदारी सुद्धा जेटली आपल्या खांद्यावर घेत होते. ड्रायव्हर जगन आणि सहायक पद्म यांच्यासह जवळपास 10 कर्मचारी जेटली कुटुंबियांसोबत गेल्या 3 दशकांपासून काम करत आहेत. यापैकी तिघांची मुले परदेशात शिकत आहेत.

सहकाऱ्यांचा एक मुलगा डॉक्टर, दुसरी अभियंता
जेटलींच्या कुटुंबियांच्या जेवणाची काळजी घेणारे जोगेंद्र यांच्या दोन मुलींपैकी एक लंडनमध्ये शिकत आहे. तर संसदेत सावलीसारखे सोबत राहिलेले गोपाल भंडारी यांचा मुलगा डॉक्टर आणि दुसरा मुलगा अभियंता आहे. याव्यतिरिक्त स्टाफमध्ये सर्वात चर्चित चेहरा असलेले सुरेंद्र हे जेटलींसोबत त्यांच्या वकीली प्रॅक्टिसच्या काळापासून आहेत. घरातील कार्यालय आणि त्यासंबंधित सर्वच कामांची जबाबदारी सुरेंद्र यांच्यावर होती. या सर्वांच्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काळजी जेटली घेत होते. जेटलींनी 2005 मध्ये आपले सहाय्यक सहायक राहिलेले ओपी शर्मा यांचा मुलगा चेतन यांना कायद्याची पदवी मिळवण्यात आर्थिक मदत केली. यानंतर आपली 6666 क्रमांक असलेली अॅसेंट कार गिफ्ट केली होती.

मुलांपासून स्टाफपर्यंत सर्वांनाच चेक ने पैसे द्यायचे जेटली
आर्थिक नियोजनात जेटली एक्सपर्ट होते. त्यासाठी ते आवश्यक काळजी देखील घेत होते. एकेकाळी ते आपला मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली यांना पॉकेट मनी द्यायचे. हा पॉकेट मनी जेटली चक्क चेकने अदा करत होते. एवढेच नव्हे, तर स्टाफचे वेतन आणि त्यांना दिली जाणारी आर्थिक मदत सुद्धा कॅशमध्ये न देता ते चेकनेच देत होते. त्यांनी वकीली प्रॅक्टिस करताना मदतीसाठी वेलफेअर फंड बनवला होता. याचे व्यवस्थापन ते एका ट्रस्टच्या माध्यमातून करत होते. ज्या कर्मचाऱ्याचा मुलगा परीक्षेत चांगले गुण मिळवणार त्याला जेटली यांच्या पत्नी संगीता देखील गिफ्ट देऊन प्रोत्साहित करतात.

बातम्या आणखी आहेत...