Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Remember these things for the family's happiness and prosperity

कुटुंबाच्या सुख-शांती आणि धन वृद्धीसाठी या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

रिलिजन डेस्क | Update - Jun 06, 2019, 12:05 AM IST

घरामध्ये घडणाऱ्या चुकांमुळे तुमची गरीब वाढू शकते. येथे जाणून घ्या, अशाच पाच चुका ज्यामुळे घरातील दोष वाढून धनहानीचे योग जुळून येतात...

 • Remember these things for the family's happiness and prosperity

  घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी ज्योतिष आणि वास्तूमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास सकारात्मक फळ प्राप्त होण्याची शक्यता वाढते. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार घरामध्ये घडणाऱ्या चुकांमुळे गरीब वाढू शकते. येथे जाणून घ्या, अशाच पाच चुका ज्यामुळे घरातील दोष वाढून धनहानीचे योग जुळून येतात...

  1. वास्तुनुसार उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशा देवी-देवता आणि धनाशी संबंधित असते. ज्या घरांमध्ये या दिशेला अस्वच्छता असते किंवा जड सामान ठेवलेले असते अशा घरात नेहमी आर्थिक तंगी राहते. घरामध्ये धनाची आवक होत नाही.


  2. उत्तर-पूर्व दिशेप्रमाणेच उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशासुद्धा धन संबंधित कामासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. या दिशेला रात्रीच्या वेळी अंधार ठेवू नये. ही दिशासुद्धा नेहमी स्वच्छ ठेवावी, अन्यथा धनलाभाचे योग जुळून येणार नाहीत.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वास्तू आणि दिशांशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

 • Remember these things for the family's happiness and prosperity

  3. दक्षिण दिशेला दरवाजा किंवा तिजोरी असू नये. या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी असल्यास धनहानीचे योग जुळून येतात. या दिशेला तिजोरी किंवा दरवाजा असल्यास त्यावर लाल रिबिनमध्ये तीन नाणे बांधून ठेवावेत.


  4. ज्या घरामध्ये उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेला किचन असते, त्या घरात पैशांची अडचण कायम राहते. पश्चिम किंवा दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशा किचनसाठी शुभ मानली जाते.

 • Remember these things for the family's happiness and prosperity

  5. घरातील मुख्य व्यक्ती दक्षिण-पूर्व दिशेला झोपत असल्यास यामुळे संपूर्ण कुटुंबाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील मुख्य व्यक्तीने या दिशेला झोपू नये.

Trending