B'day: या अॅक्ट्रेसच्या / B'day: या अॅक्ट्रेसच्या बाथरुममध्ये सापडले होते लाखो रुपये, पैसे वाचवण्यासाठी या थराला गेली ही अभिनेत्री

Nov 11,2018 12:00:00 AM IST

गतकाळातील अभिनेत्री माला सिन्हा आज 82 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 साली कोलकात्यात झाला होता. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या माला सिन्हा या फार 'कंजूस' असल्याचे म्हटले जाते. त्यांना हा वारसा वडिलांकडून म्हणजे अल्बर्ट सिन्हा यांच्याकडून मिळाल्याचे म्हटले होते. अशीही माहिती आहे की त्यांच्या घरावर इनकम टॅक्सीचाच छापा पडला होता, त्यात त्यांच्या बाथरुमच्या भिंतीमधून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. हे पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी कोर्टात लिखित स्वरुपात दिले होते की हे पैसे त्यांनी फिजिकल रिलेशन ठेवून कमावलेले आहेत.


वकिलाच्या सल्ल्याने दिले होते लिहून...
- माला सिन्हा यांच्या घरावर छापा पडला आणि प्रकरण कोर्टात गेले होते. अल्बर्ट आणि माला यांना त्यांची रक्कम परत मिळावी यासाठी त्यांच्या वकिलाने अनेक तर्क दिले होते. मात्र कोर्टाने एकही तर्क मान्य केला नसल्याचे म्हटले जाते. तेव्हा त्यांच्या वकिलान अल्बर्ट यांना सांगितले की आता हे पैसे वाचावण्यासाठी एकच उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला मालाची मदत घ्यावी लागेल. मालाने कोर्टात लिहून दिले पाहिजे की हे पैसे तिने शरीर संबंधातून कमावले आहेत. विशेष म्हणजे तेव्हा माला सिन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध नाव होते. कोर्टामध्ये स्वतःबद्दल असे सांगणे मालासाठी सोपे नक्कीच नव्हते, तेही तेव्हा जेव्हा सर्व लोक माला सिन्हाला ओळखत होते. करिअर भरात असताना फक्त वडिलांसाठी माला सिन्हाने कोर्टात ते वक्तव्य केले होते. कारण ती देखील पैशांची खूप लोभी होती. अखेर मालाने वकिलाने सांगितल्या प्रमाणे कोर्टात कबूल केले आणि या परिस्थितीत कोर्टाला मालाचे पैसे परत करावे लागले.
माला सिन्हा ही तिच्या काळातील यशस्वी अभिनेत्री होती. मात्र हेही तेवढेच खरे आहे की फिसच्या रुपात मोठी रक्कम घेणारी माला सिन्हा स्वभावाने फार कंजूस होत्या.

X