आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: ...म्हणून बाळासाहेबांनी केली होती दादांची मदत, दादांच्या सिनेमापुढे जेम्स बाँडचा सिनेमा ठरला होता फ्लॉप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. व्हाईट कॉलर्ड वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, सिनेमातल्या तारकेशी पडद्यावरची नको तितकी घसट, यामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके, यांनी त्यांच्या सिनेमांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली. पिटातल्या प्रेक्षकांना मात्र या सर्वांशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे.

 

आज दादांची 86वी जयंती आहे, त्यानिमित्ताने उजाळा देऊयात त्यांच्या आठवणींना... 

 

बाळासाहेब ठाकरेंची मिळाली होती मदत... 

दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही थोडी वादग्रस्त ठरली. कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या सिनेमाच्या आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा 'तीन देवियाँ' हा सिनेमा प्रदर्शित करण्याचे ठरवले. तेव्हा दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले.  मग काय विचारता; शिवसैनिकांनी कोहिनूर बाहेर राडा घातला.  कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच दादांचा 'सोंगाड्या' हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला.

 

राज कपूर यांना पुढे ढकलावी लागली होती सिनेमाची रिलीज डेट...  

1972 मध्ये दादांचा 'एकटा जीव सदाशिव' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूर यांना आपल्या मुलाला लाँच करताना त्यांच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलावी लागली होती. आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

 

पुढे वाचा, दादांच्या सिनेमापुढे जेम्स बाँडचा सिनेमा ठरला होता फ्लॉप... यासह बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...