आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीदिन:सरपंच ते केंद्रीय मंत्री अशा होता विलासरावांचा थक्क करणारा प्रवास, यामुळे गमावले मुख्यमंत्रीपद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्राचा लोकनेता, मराठवाड्याचे भूमिपुत्र, दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज स्मृतीदिन आहे. सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा विलासरावांचा प्रवास थक्‍क करणारा आहे. दांडगा जनसंपर्क असलेले विलासराव केवळ राजकारणीच नव्‍हते तर ते एक समाजसेवकही होते. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्‍त्‍वाला विविध पैलू होते. 14 ऑगस्‍ट रोजी विलासराव देशमुख यांचा स्‍मृतीदिन. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या या कार्याला आणि आठवणींना उजाळा देणार आहोत. 


अशी आहे विलासरावांची थक्क करणारी कारकिर्द 
>> विलासराव देशमुखांनी पुणे विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली.
>> वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे 1974 मध्ये ते बाभळगावचे सरपंच झाले.
>> युवक काँग्रेस नेते, तत्‍कालिन एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समिती उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य या पदांवरही त्यांनी काम केले. 
>> राजकारणातील असा प्रवास करत ते 1980 मध्‍ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
>> आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही.
>> 18 ऑक्टोबर, 1999 ते 16 जानेवारी, 2003 व 1 नोव्हेंबर, 2004 ते 4 डिसेंबर, 2008 या कालखंडांत दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
>> विलासरावांनी शिक्षण, कृषि, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार पाहिला.
>> 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.
>> मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
>> विलासरावांचे शिक्षणः बीएससी, बीए, एलएलबी.
>> विलासरावांच्‍या वडिलांचे नाव दगडोजीराव, तर आईचे सुशीलादेवी.
>> पत्नी वैशाली यांच्‍यासोबत 29 मे 1975 रोजी ते विवाहबद्ध झाले.
>> अमित, अभिनेता रितेश आणि धीरज हे विलासराव यांचे तीन मुले.
>> 14 ऑगस्ट 2012 रोजी विलासरावांचे आजारपणामुळे अकाली निधन झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...