आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी सुरक्षा काढा, उगाच खर्च नको : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हजारे यांनी मात्र आपली सुरक्षा काढून घ्यावी, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारी पाठवले. मला दिलेल्या सुरक्षेवर मोठा खर्च होतो. जनतेचा पैसा या सुरक्षेवर खर्च होऊ नये, म्हणून ती काढून टाकण्यात यावी. अप्रिय घटना घडली तरी सरकारवर कोणतीही जबाबदारी येणार नाही. ज्यांना सुरक्षा कमी पडते अशांना ती देण्यात यावी, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. 

तृप्ती देसाईंनी घेतली भेट : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना २१ दिवसांत शिक्षा देण्याची तरतूद असणाऱ्या तेलंगण सरकारच्या धर्तीवर श्रद्धा नावाने नवा कठोरकायदा करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरेंकडे करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन सांगिितले.