आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेनॉने लाँच केले क्विडचे नवे मॉडेल, किंमत २.६७ लाख रुपयांपासून सुरू 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | फ्रेंच ऑटोमोबाइल कंपनी रेनॉने भारतात सर्वात कमी किमतीच्या स्मॉल कार क्विडचे नवे मॉडेल लाँच केले आहे. सुरक्षेच्या अधिक उपायांसह या कारची किंमत २.६७ लाख रुपयांपासून ते ४.६३ लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरूम)आहे. नव्या क्विडमध्ये दोन इंजिन पर्यायांत ०.८ लिटर आणि एक लिटर पेट्रोल व्हर्जन उपलब्ध आहे. त्याचबरोबर मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक गिअरचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. 

 

मॅन्युअली, अॉटोमॅटिक गिअरच्या पर्यायांसह : सुरक्षेच्या फीचर्ससंदर्भात या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) देण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये चालक एअरबॅग्जसह चालक आणि सहचालक सीट बेल्ट रिमाइंडरदेखील देण्यात आले आहेत. कारमध्ये १७.६४ सेंटिमीटरची टचस्क्रीन मीडिया अँड नेव्हिगेशन प्रणाली आहे. ही अँड्रॉइड आणि अॅपल कार प्ले दोन्ही सोबत कॉम्पॅटिबल आहे. क्विड रेनॉची भारतातील एक यशस्वी कार आहे. कंपनीने आतापर्यंत २.७५ लाख क्विड कारची विक्री केलेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...