आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेनॉची सात आसनी ‘ट्रायबर’ काॅम्पॅक्ट एमपीव्ही लॉन्च, किंमत ४.९५ लाखापासून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेनॉने आपले ट्रायबल हे नवे माॅडेल भारतीय बाजारपेठेत दाखल केले आहे. ट्रायबरच्या सुरुवातीच्या मॉडलची किंमत ४.९५ लाख रुपये आहे. ट्रायबर सात आसनी काॅम्पॅक्ट एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेईकल) आहे.त्याची लांबी ४ मीटरपेक्षश कमी आहे. ही सध्या पेट्राेल इंजिनासह उपलब्ध आहे. ट्रायबरची आसने खास असून ती काढता येतात, खाली वाकवता येऊ शकतात. रेनॉ ट्रायबर एमपीव्ही ४ प्रकार आणि ५ रंगात उपलब्ध आहे. माेटारीला समाेरच्या बाजुला ट्रिपल एज क्रोम फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, ड्युएल टोन फ्रंट बंपर, व्हिल आर्च दिले आहेत.