Home | Business | Auto | renault motors

रेनॉ मोटर्सची नविन लक्झरी कार भारतात दाखल

team divya marathi | Update - May 24, 2011, 06:58 PM IST

रेनॉ मोटर्सने भारतात 'फ्लुएंस' नावाची लक्झरी कार सादर केली आहे.

  • renault motors

    रेनॉ मोटर्सची नविन लक्झरी कार भारतात दाखल

    रेनॉ मोटर्सने भारतात 'फ्लुएंस' नावाची लक्झरी कार सादर केली आहे. या गाडीची किंमत दिल्लीमध्ये एक्स शोरूम किंमत १४.९९ ते १४.४0 लाख रुपयांपर्यंत आहे. आशियातील बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून या गाडीची रचना करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये गाडी उपलब्ध आहे. विशेष रचनेमुळे ही गाडी तिच्या सेगमेंटमध्ये निश्चितच स्पर्धा निर्माण करेल, असा विश्वास रेनॉ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मार्क नसिफ यांनी व्यक्त केला आहे. 'फ्लुएंस'ची बांधणी रेनॉ मोटर्सच्या चेन्नई येथील कारखान्यात करण्यात आली आहे. भारतात बांधणी केलेली ही रेनॉ मोटर्सची पहिलीच गाडी आहे. या गाडीचे पेट्रोल मॉडेल २000 सीसी तर डिझेल व्हेरियंटचे मॉडेल १५00 सीसी इंजिन क्षमतेचे आहे.

Trending