Home | Business | Auto | renault-spare-parts

रेनॉ मोटर्स सुट्या भागांची आयात वाढविणार

team divya marathi | Update - May 24, 2011, 07:05 PM IST

युरोपची दुस-या क्रमांकाची कार निर्माता कंपनी रेनॉ मोटर्स भारतातून सुट्या भागांची आयात वाढविणार आहे.

  • renault-spare-parts

    रेनॉ मोटर्स सुट्या भागांची आयात वाढविणार

    युरोपची दुस-या क्रमांकाची कार निर्माता कंपनी रेनॉ मोटर्स भारतातून सुट्या भागांची आयात वाढविणार आहे. सुमारे 10 कोटी युरो म्हणजे आजच्या किंमतीनुसार सुमारे 600 कोटी रुपयांचे सुटे भाग आयात करण्याची कंपनीची योजना आहे. रेनॉ मोटर्सने सोमवारी फ्लुएंस या नव्या गाडीचे अनावरण केले. त्यावेळी कंपनीच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.

    कंपनीने गेल्या वर्षी 3.5 कोटी युरो किंमतीचे सुटे भाग आयात केले होते. चालू वित्तिय वर्षात हा आकडा सुमारे 8 कोटी युरोच्या जवळपास राहील. तर 2012 मध्ये हा आकडा 10 कोटी युरोपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.

Trending