Home | Business | Auto | renault started 100 station in india

रेनॉल्ट कंपनी २०१२ पर्यंत १०० डिलर वाढविणार

agency | Update - May 28, 2011, 07:59 PM IST

कार बनविण्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱया फ्रॉन्सची आघाडीची कंपनी रेनॉल्टने भारतात आपला व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला

  • renault started 100 station in india

    अहमदाबाद- कार बनविण्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱया फ्रॉन्समधील आघाडीची कंपनी रेनॉल्टने भारतात आपला व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला असून कंपनी २०१२ पर्यंत भारतात सुमारे ७५ शहरात किमान १०० डिलर तयार करणार आहे. त्यावेळी कंपनीकडून पाच प्रकारच्या श्रेणीतील मॉडेल उपलब्ध करुन देण्यात येतील.

    कंपनीची सध्या देशात १४ डिलर असून यावर्षाअखेर ती ४० करण्याचा कंपनीचा मानस आहे. भारतातील व्यवसायाकडे आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून असून आमच्या व्यवसायासाठी पहिल्या तीनमध्ये भारताचा समावेश केला आहे, असे रेनॉल्ट इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष लेन कुरियन यांनी सांगितले. आम्ही वेगवेगळ्या श्रेणीतील कारगाड्या लवकरच बाजारात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


Trending