आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड फिल्म मेकर्सचा आवडीचा विषय राहिला आहे LGBT, 'बॉम्गे'पासून 'अलीगढ'पर्यंत बनले आहेत अनेक चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः इंडस्ट्रीत दीर्घ काळापासून चित्रपटांमध्ये समलैंगिक संबंधांवर चित्रपट बनत आले आहेत. जेव्हा जेव्हा चित्रपटांमध्ये हा विषय चर्चेत आणला गेला, तेव्हा तेव्हा त्यावरुन वादंग उठले आहे. अनेक चित्रपटांवर तर बंदी घालण्यात आली आहे. बॉलिवूडमधील समलैंगिक विषयांवरील चित्रपटांनी चांगलीच चर्चा एकवटली आहे. 


1996 आणि दोन समलैंगिक चित्रपट : यावर्षी आलेला 'बॉम्गे' हा पहिला समलैंगिक विषयावर आधारित चित्रपट समजला जातो. हा चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही. तर याचवर्षी शबाना आझमी आणि नंदिता दास स्टारर 'फायर' चित्रपट रिलीज झाला होता. दीपा मेहता दिग्दर्शित या चित्रपटाने चांगलीच चर्चा एकवटली होती.


- या चित्रपटाची कहाणी दोन महिलांच्या समलैंगिक संबंधांवर आधारित होता. हा सर्वात वादग्रस्त चित्रपट ठरला होता. 

 

या चित्रपटाला सेन्सॉरने दिली नव्हती मान्यता : बॉलिवूडमध्ये समलैंगिक विषयावर आधारित चित्रपट बनले असले तरी सेन्सॉरने मात्र त्यांना परवानगी दिली नाही. सेन्सॉरची कात्री या चित्रपटांवर चालली. यामध्ये विशेषतः 'डू नो वाई-न जानें क्यों', 'अनफ्रीडम' या चित्रपटांचा समावेश आहे. 2014 मध्ये बनलेल्या 'अनफ्रीडम' या चित्रपटाच्या रिलीजवर भारतात बंदी घालण्यात आली होती. 


- याशिवाय कपूर एंड संस, डीयर डॅड, माय सन इज गे, जस्ट अनदर लव स्टोरी, संचारम, लेडीज एंड जेंटल वीमन हेदेखील याच श्रेणीतील चित्रपट आहेत. 

 

2002 मध्ये आलेला 'मँगो सुफले' : या चित्रपटावरुनही बराच वाद निर्माण झाला होता. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महेश दत्तानी यांनी 2002 साली 'मँगो सुफले' हा चित्रपट बनवला होता. यामध्ये रिंकी खन्ना मेन लीडमध्ये होती. 

 

2004 मध्ये आला 'गर्लफ्रेंड' चित्रपट: या चित्रपटानेही वादाला जन्म दिला. चित्रपटात लेस्बियन संबंधांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. हा चित्रपट बोल्ड चित्रपटांमध्ये गणला जातो. यामध्ये ईशा कोपिकर आणि अमृता अरोरा मेन लीडमध्ये होत्या.


2005 मध्ये आला 'माय ब्रदर निखिल' : ओनिर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातही समलैंगिक संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला होता. चित्रपटात संजय सूरी मेन लीडमध्ये होता. तर जुही चावलाने त्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. 'माय ब्रदर निखिल' या चित्रपटाचा समलैंगिक नाते आणि एड्स हा विषय होता.  

 

2008 मध्ये आलेला चित्रपट 'दोस्ताना' : अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहमसोबत प्रियांका चोप्रा चित्रपटात मेन लीडमध्ये होती. मेनस्ट्रीम चित्रपटांमधील हा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये LGBT कम्युनिटीच्या नात्यांना कॉमिक अंदाजात दाखवण्यात आले होते.

 

2010 मध्ये आलेला चित्रपट 'आयएम' : चित्रपटाचे बरेच कौतुक झाले होते. हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला गे चित्रपट होता. या चित्रपटात वेगवेगळ्या चार कथा दाखवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक कथा समलैंगिक संबंधांवर आधारित होती.

 

2013 मध्ये आलेला चित्रपट 'बॉम्‍बे टॉकीज' : या चित्रपटात शाकिब सलीम आणि रणदीप हुड्डा यांचा एक किसींग सीन दाखवण्यात आला होता. बॉलिवूडच्या चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन 2013 साली 'बॉम्बे टॉकीज' हा चित्रपट बनवला होता. रणदीप आणि शाकिब यांनी चित्रपटात गे कपलची भूमिका साकारली होती. 

 

2014 मध्ये आलेला चित्रपट 'मार्ग्रीटा विद ए स्ट्रॉ' : या चित्रपटात कल्कि कोचलिन हिने सेरेब्रल पाल्सी पीडित तरुणीची भूमिका साकारली होती. तिच्यासह चित्रपटात सयानी गुप्ता आणि रेवती यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. कल्किने या चित्रपटात बायोसेक्सुअल तरुणीची भूमिका साकारली होती, जी एका तरुणाकडे आकर्षित होते. 


2015 मध्ये आलेला चित्रपट 'अलीगढ': मनोज वाजपेयीने समलैंगिक विषयावर आधारित या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. अलीगढमध्ये मनोजने शिक्षकाची भूमिका साकारली होती, जो समलैंगिक असतो. हंसल मेहता यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि यामध्ये राजकुमार राव याचीही एक महत्त्वाची भूमिका होती. 

 

बातम्या आणखी आहेत...