Home | National | Other State | Renu Murder case women killed for dowry Sikar Rajasthan News

लग्नाच्या 9 महिन्यानंतर 7 महिने गरोदर असलेल्या पत्नीचा घेतला जीव, खून करून तिच्या बाजुलाच झोपला पती, पोलिसांना म्हणाला-ती कशी मेली मला माहित नाही, मृत्यूपूर्वी महिलेनी आईला सांगितले होते कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 11, 2019, 06:14 PM IST

चार वर्षानंतर आला निकाल, आयुष्यभर तुरूंगात राहतील पती आणि सासू-सासरे

  • Renu Murder case women killed for dowry Sikar Rajasthan News

    सीकर(राजस्थान)- चार वर्षानंतर कोर्टाने हूंड्यासाठी पत्नीचा जीव घेतलेल्या पती आणि सासु-सासऱ्याला आजिवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अप्पर सेशन न्यायाधीश क्रम संख्या-4 सुरेंद्र कुमार पुरोहितने आरोपी बलबीर सिंह, पत्नी सुखवंत बलबीर सिंह आणि मुलगा अभिमन्यु उर्फ सेठी यांना दोषी करार दिला.


    पीडित पक्षांचे वकील राजेंद्र हुड्डाने सांगितले की, 27 नोव्हेंबर 2014 ला लक्ष्मण सिंह बाटडने उद्योगनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी मुलगी रेणुचे लग्न 24 फेब्रुवारी 2014 ला दीनारपुरामध्ये राहणाऱ्या अभिमन्यु बलबीर सिंहसोबत केले होते. त्यांनी लग्नात हुंडा, गिफ्ट आणि स्विफ्ट डिझायर गाडी दिली होती. लग्न झाल्यापासून सासरकडच्या लोकांनी रेणूला माहेरी पाठवले बंद केले होते. रेणुने फोनवर सांगितले होते की, सासरकडचे तिला त्रास देत होते. सासरकडचे लोकांनी तिला अनेकवेळा मारहाण केली होती. ते हुंडा घेऊन ये असे नेहमी सांगायचे. 27 नोव्हेंबर 2014 ला रेणूच्या सासऱ्याने बलबीर सिंहला सांगिले की, रेणूने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अभिमन्यूने सांगितले की, घटनेवेळी तो रूममध्ये होता. रेणुच्या डोक्याला मागील बाजुने जखम होती. पोलिसांनी तपास केला तेव्हा समोर आले की, पती, सासु-सासरे आणि दीराने रेणुला मारून तिने गळफास घेतला असे बनाव केला.

Trending