आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Bhabhi Renuka Shahane Support Tanushree Dutta In Nana Patekar Controversy She Post Latter On Facebook

तनुश्री दत्ताच्या पाठीशी उभ्या राहिल्या अभिनेत्री रेणुका शहाणे, लिहिले मोठे लेटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. सलमान खानची ऑनस्क्रीन भाभी म्हणजेच रेणुका शहाणेही आता तनुश्री दत्ताच्या सपोर्टमध्ये उतरली आहे. रेणुकाने नाना पाटेकर यांच्या विरुध्द लांबलचक पत्र लिहिले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सेटवर नाना व्यतिरिक्त उपस्थित असलेल्या लोकांना विचारले, "जर तनुश्रीच्या ठिकाणी तिथे उपस्थित लोकांपैकी कुणाची मुलगी असती, तर कसे वाटले असते? तेव्हा तुम्ही काही पाऊल उचलेले असते? कदाचित मुली सारखी आणि मुलगी यांमध्ये हाच फरक आहे." रेणुका पुढे म्हणाल्या की, "जेव्हा चार पुरुष एका मुलीचा आवाज बंद करण्याच्या समर्थनार्थ उभे राहिले तर तिला आणि तिच्या घरच्यांची तोंड बंद करण्यासाठी पॉलिटिकल पार्टीची मदत घेण्यात आली. ही एक मोठी रिअॅक्शनच आहे."

 

रेणुका पुढे म्हणाल्या, नानानी तनुश्रीला वाईट स्पर्श केला तेव्हा कोरिओग्राफर-डायरेक्टर पुढे का आले नाहीत...
- रेणुकाने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, "नाना पाटेकरांना महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी काम करण्यासाठी ओळखले जाते. यामुळे त्यांना सन्मान मिळतो. पण दुसरी बाजू पाहता नानांचा स्वभाव खुप रागिट आहे आणि याचा सामना इंडस्ट्रीतिल अनेकांना करावा लागला आहे."
- "मी कधी नानांसोबत काम केलेले नाही आणि तनुश्रीसोबतही केले नाही. पण तनुश्रीचे मुद्दे मी लक्षात घेतले. ती म्हणाली की, डान्स करताना मला असहज वाटत होते, नानानी वाईट प्रकारे केलेला स्पर्श तिला आवडला नव्हता."
- "समजा नानाचा उद्देश तरुणीला वाईट प्रकारे स्पर्श करण्याचा नव्हता. पण कोरियोग्राफर-डायरेक्टरला त्या दरम्यान अभिनेत्रीचे समर्थन करायला हवे होते. कामाच्या ठिकाणी लोकांच्या मनात दहशत निर्माण करणे योग्य आहे का की, सर्व लोक मिळून काम करतील असे वातावरण बनवायला हवे."
- "जर एखाद्या महिलेला सेटवर असहज वाटत असेल तर सर्व लोकांनी मिळून तिला असहज फिल करुन द्यावे हे गरजेचे आहे का. येथे अहंकार जिंकत आहे. फक्त फिल्म इंडस्ट्री नाही तर प्रत्येक ठिकाणी फक्त पुरुषांना सपोर्ट मिळतोय."

 

चित्रपटामध्ये लागला होता अंडरवर्ल्डचा पैसा 
- रेणुकाने पुढे लिहिले, "पुर्ण कथेमध्ये ज्या व्यक्तीला दाबण्यात आले, ती म्हणजे एकटी तनुश्री आहे. त्या चित्रपटाचे अनेक लीगल इश्यूही होते. पेमेंट्सविषयी काही प्रॉब्लम होते. चित्रपटावर अंडरवर्ल्ड पैसा लावला होता असेही ऐकले होते."
- "मी पाहिले आहे, जगात असे अनेक छोटे लोक आहेत, ज्यांचे ईगो खुप मोठे आहेत आणि त्यांच्याजवळ खुप पावरही आहे. मी जेव्हा अनेक लोकांना एकाच व्यक्तीवर बोट ठेवताना पाहते, तेव्हा मला काहीना काही गडबड वाटते."
-  "हे माणुसकीचा गळा आवळण्यासारखे आहे, ज्या लोकांना त्या दिवशी सेटवर जिंवत असल्यासारखे वाटत होते त्यांच्या तुलनेत तनुश्री खुप समजदार आहे, "

 

बातम्या आणखी आहेत...