आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन : जर तुम्ही प्रकृतीबाबत चिंतित आहात आणि तंदुरुस्तीसाठी वारंवार खाण्यापिण्यात किंवा आहारात बदल करत असाल तर यात फायदा नाही तर नुकसान होऊ शकते. तुमचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडू शकते. एवढेच नव्हे तर वयदेखील कमी होऊ शकते. हा खुलासा इंग्लंडमधील शेफील्ड विद्यापीठ आणि सायंटिस्टच्या ताज्या संशोधनात झाला आहे. या संशोधनानुसार जर तुम्ही बिनधास्तपणे प्रत्येक प्रकारचे जेवण करत असाल आणि अचानक आरोग्य सुधारण्याच्या नावावर पौष्टिक खाद्य घ्यायला सुरुवात केली तर ते नुकसान करते. संशोधकांनी यासाठी फ्रूट फ्लाइज किंवा ड्रोसोफिलिया मेलानोगास्टर प्रकारच्या माशांवर प्रयोग केला. या माशांना आधी असे खाद्य देण्यात आले, जे रोजच्यापेक्षा वेगळे होते. त्यानंतर पुन्हा रोजचे खाद्य दिले जाऊ लागले. यामुळे त्यांची हानी होऊ लागली. रिच डाएट किंवा नियमित डाएटवाल्या माशांच्या तुलनेत या माशांचा मृत्यू होण्याची शक्यता वाढली. अनेक माशांचा मृत्यू झाला, अंडीही कमी दिली. रिच डाएटसाठी माशा तयार नव्हत्या.
संशोधनात सहभागी शास्त्रज्ञ डॉ. मिरे सीमंत सांगतात की, हे आमच्या अपेक्षा आणि विकासाच्या प्रचलित सिद्धांतांच्या विपरीत होते. विशेष किंवा पोषक तत्त्वांची आहारातील कमतरता मनुष्य आणि प्राण्यांमध्ये जिवंत राहण्याची क्षमता विकसित करते. त्यांच्यात ही क्षमता असते की, जोपर्यंत पौष्टिक भोजन मिळत नाही तोपर्यंत ते जेवणाची टंचाईच्या स्थितीत जिवंत राहणे आणि शरीरात ऊर्जा कायम ठेवण्यात सक्षम असतात. मात्र, खाण्यापिण्यात सतत बदल करण्याची सवय या क्षमतेवर आणि एवढेच नव्हे तर आयुर्मानही कमी करते. संशाेधक अँड्रयू मॅकक्रेकन सांगतात की, प्रतिबंधित खाद्य एखाद्या नुकसानीचे मूळ कारणदेखील असू शकते हे सर्वात अाश्चर्यकारक आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.