आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात २० मिनिटाला १ महिला अत्याचाराला बळी, अत्याचाराच्या ६८ टक्के प्रकरणांत आरोपी मोकाट

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

महेश जोशी 

औरंगाबाद - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून महिला प्राध्यापिकेला जाळण्याच्या प्रकाराने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, महिलेवरील अत्याचाराची ही काही पहिली घटना नाही. अनेक प्रकरणांत लैंगिक अत्याचारानंतर महिलेची हत्या, जिवंत जाळण्याचे प्रकार घडले आहेत. देशात दर २० मिनिटाला एक महिला अशा अत्याचाराला बळी पडते. महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असताना तिच्या तक्रारीची दखल घेऊन आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण घटत चालले आहे. तर तपासातील ढिलाई आणि साक्षीदार फितूर होण्याच्या प्रकारांमुळे अशा गुन्ह्यातील ६८ टक्के आरोपी मोकाट सुटत  आहेत. 
अशा घटनांच्या जागतिक क्रमवारीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. देशात महिला अत्याचाराला बळी पडते. मात्र, तिला न्याय मिळत नाही हे वास्तव समोर आले आहे. त्यांना योग्य वेळी शिक्षा झाली तर कायद्याचा धाक वाटून अशा घटनांची पुनरावृत्ती टळू शकेल.६८ टक्के प्रकरणांत आरोपी मोकाट

भारतात दरवर्षी बलात्कारांचे प्रमाण वाढत असताना २०१७ मध्ये पहिल्यांदाच हे प्रमाण घटले. एनसीआरबीच्या २०१७ च्या अहवालानुसार वर्षभरात ३२,५५९ बलात्कारांची नोंद झाली. हे प्रमाण घटले असताना आणखी एक समाधानाची बाब म्हणजे अशा प्रकरणांतील गुन्हे निश्चितीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. २०१० मध्ये आरोपींना िशक्षा होण्याचे प्रमाण २६.५६ टक्के होते. २०१७ मध्ये ते ३२.२० टक्के झाले. 
 

जगभरातील ३६ % महिलांना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते


जगभरातील ३६ टक्के महिलांना कोणत्या ना काेणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. देशाच्या एक लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या बलात्काराच्या घटनांच्या आधारावर ‘लिंक्डइन’ आणि ‘दि वंडरलिस्ट’ या संस्थांनी २०१८ ची जगातील सर्वाधिक बलात्कारी देशांची यादी जाहीर  केली आहे. यात भारताचा पाचवा क्रमांक आहे.बलात्काराची ५ कारणे
 

 • नशा- जगभरातील ८५ टक्के बलात्कार नशेत होतात.
 • गुुंडांचे अड्डे- जुन्या इमारती, बंद कार्यालये, पडके वाडे गुंड लोकांचा अड्डा असतो. येथे गेलेली महिला बळी पडते. ६५ टक्के बलात्कार अशा ठिकाणी होतात.
 • कायद्यातील पळवाटा- वर्षानुवर्षे चालणारे खटले, पुराव्याअभावी निसटणारे आरोपी आणि पीडितेलाच आरोपी समजण्याची मानसिकता.
 • पुरुषांची मानसिकता-कट्ट्यावरील हास्यविनोदापासून इंटरनेटवरील मीम्समध्ये लैंगिक विचारांचा भडिमार असतो. हे विचार बलात्कारास प्रवृत्त करतात.
 • आत्मविश्वासाची कमी-महिलांना लहानपणापासूनच दुर्बल, गरीब असल्याचे ठासवले जाते. यामुळे तिच्यात धाडस राहत नाही.

आरोपपत्र दाखल होण्याचे प्रमाणही घटले
 
गुन्हे निश्चितीकरणाचे प्रमाण वाढले ही समाधानकारक बाब असली तरी आरोपपत्र दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल होण्याचे  प्रमाण ९५.४ टक्के होते. २०१७ मध्ये ते ८६.६ टक्के राहिले. २०१७ मध्ये १,४६,२०१ बलात्काराच्या प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी झाली. त्यापैकी १८,०९९ प्रकरणे निकाली लागली. यापैकी ५,८२२ प्रकरणांत आरोपीला शिक्षा तर ११,४५३ प्रकरणांत निर्दाेष सुटका झाली.बलात्काराची नोंद न होण्याची पाच प्रमुख कारणे
 

 • राजकीय दबाव- आरोपी पोलिस आणि पीडितेवर राजकीय पक्षाचा दबाव आणून गुन्हा दाखल न करण्याचा प्रयत्न करतो.
 • गावाची इज्जत - गावांमध्ये बहुतेक सर्व घरी एकमेकांचे नातेवाईक असतात. यामुळे घरातल्या घरात निपटून घेण्यावर भर असतो. पोलिस केस झाली तर इतर मुलींचे विवाह लांबण्याची भीती.
 • मुलीचा विवाह - बलात्काराची तक्रार केली तर मुलीचा विवाह होणार नसल्याची भीती. समाजात विवाहासाठी अजूनही कौमार्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. मुलीलाच दोषी धरले जाते.
 • बदनामीची भीती - बलात्कारामुळे घराची, कुटंुंबाची बदनामी होण्याची भीती वाटते.
 • जातीय भेदभाव- खालच्या जातीच्या मुलीवरील बलात्काराची नोंद घेणे पोलिस टाळतात. आरोपी उच्च जातीचा असल्यास पोलिस दबावाला बळी पडतात. आर्थिक व्यवहार होतात.

जगातील अत्याचारांचे प्रमाण

 • दक्षिण आफ्रिका - वर्षाकाठी ५ लाख बलात्कार. १५ टक्के ११ वर्षांखालील मुलींवर. १० पैकी केवळ १ घटनेची नोंद.
 • स्वीडन - एक लाखामागे ६३ महिलांवर बलात्कार. ४ पैकी एक महिला शिकार.
 • अमेरिका - ३ पैैकी एका महिलेवर लैंगिक अत्याचार. वर्षाला ३,६१,५३४ महिला शिकार. १०७ सेकंदांत एका महिलेवर बलात्कार.
 • इंग्लंड, वेल्स- ८५,००० महिलांवर वर्षाकाठी बलात्कार. यात १२ हजार पुरुषांचा समावेश. दिवसाला २३० घटना. ५ पैकी एका महिला शिकार.
 • भारत - एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये ३२,५५९ महिलांवर बलात्कार.९३ टक्के प्रकरणांत आरोपी मित्र, नातेवाईक, शेजारी, नोकरी देणारे किंवा इंटरनेट मित्र.
 • न्यूझीलंड - ३ पैकी १ महिला वयाच्या १६ वर्षांखालील लैंगिक अत्याचाराला बळी. दरवर्षी अत्याचारांत १५ टक्के वाढ.
 • कॅनडा - वर्षाकाठी ४,६०,००० महिलांवर लैंगिक अत्याचार. एक लाखामागे ३३ अत्याचार. १७ टक्के अत्याचार १६ वर्षांखालील मुलींवर
 • ऑस्ट्रेलिया - एक लाखामागे २५ मुलींवर बलात्कार. ६ पैकी एका मुलीवर अत्याचार
 • झिम्बाब्वे - ९० मिनिटात एक बलात्कार.
 • डेन्मार्क - १० पैकी एका महिलेवर बलात्कार.