आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपोर्ट : 'दे दे प्यार दे' रोखण्यासाठी 'स्टुडंट ऑफ द इयर 2'च्या वितरकांनी सिनेमागृहाच्या मालकांना केले होते ब्लॅकमेल 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : जर चित्रपटाच्या कंटेंटमध्ये दम नसेल तर निर्माते आणि कॉर्पोरेट्स तो हिट करण्यासाठी क्रूर पद्धतींचा अवलंब करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. सिंगल आणि मल्टिप्लेक्स स्क्रीनवाल्यांशी थेट सौदेबाजी होते आणि सध्याच्या चित्रपटाला जास्त स्क्रीन्स दिल्या नाही तर आगामी चित्रपटही वितरित केले जाणार नाही, असे म्हणत ब्लॅकमेल केले जाते. ताजे उदाहरण 'स्टुडंट ऑफ द इयर 2'चे आहे. याच्या वितरकांनी सिंगल स्क्रीनवाल्यांना 'दे दे प्यार दे'चे प्रदर्शन रोखण्यासाठी विचित्र दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना सांगण्यात आले की, जर त्या लोकांनी हा चित्रपट दोन आठवडे सिनेमागृहांमध्ये ठेवला नाही तर पुढे 'इंडियाज मोस्ट वाँटेड' आणि हॉलीवूड चित्रपट 'एक्स मेन : डार्क फीनिक्स' त्यांना वितरित केला जाणार नाही. स्वत: सिंगल स्क्रीन मालकांनीच यास दुजोरा दिला आहे. 

 

आम्ही त्यांचे एेकले नाही...  
मुंबईमध्ये सिंगल स्क्रीन गेटी गॅलेक्सी आणि मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई म्हणतात, 'आमच्याकडून फॉक्स स्टारवाल्यांनी अशी डील करण्याचा प्रयत्न केला होता. 'स्टुडंट ऑफ द इयर २' दोन आठवडे सिनेमागृहांमध्ये ठेवला तरच पुढील चित्रपट तुम्हाला देऊ, असा दबाव आमच्यावर टाकला होता. मात्र, आम्ही असे करणार नाही. मराठा मंदिर सिनेमागृहात आम्ही शुक्रवारपासून अजय देवगणचा 'दे दे प्यार दे' रिलीज करत आहोत. गेटी गॅलेक्सीमधून आम्ही 'स्टुडंट ऑफ द इयर २' छोट्या सिनेमागृहात टाकला. चित्रपट चालला तर नाही, पण फ्लॉप झाला आहे.' 

 

'कलंक'साठीही टाकला होता दबाव 
'कलंक'च्या रिलीजदरम्यानही सिंगल स्क्रीन मालकांवर तिकिटांंचे दर वाढवण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. मात्र, पर एवढे करूनही हा चित्रपट चालू शकला नाही. 

 

अजय आणि यशराज यांच्यात वाद होतो तेव्हा... 
ट्रेड पंडिताने सांगितले, सात वर्षांपूर्वी 'सन ऑफ सरदार' व 'जब तक है जान'बाबतही असेच झाले होते. 'जब तक है जान'साठी यशराजने दबाव टाकला होता. 'एक था टायगर' तेव्हाच मिळेल जेव्हा दिवाळीला फक्त 'जब तक...' प्रदर्शित कराल, असे ते म्हणाले होते. 

 

याला आर्म ट्विस्टिंग म्हणतात... 
ट्रेडच्या भाषेत याला आर्म ट्विस्टिंग म्हणतात. यात मोठे वितरक कोणत्याही एका चित्रपटाला जास्त स्क्रीन मिळवून देणे आणि जास्त काळापर्यंत सिनेमागृहांमध्ये टिकवून ठेवण्यासाठी आपल्या डिस्ट्रिब्युटरशिपच्या पुढील चित्रपटाचा चाऱ्याप्रमाणे वापर करतात. 

 

बॉलीवूडमधील चर्चित आर्म ट्विस्टिंग्ज...  
रईस vs काबिल - रईससाठी शाहरुख खानने 
ऐ दिल है मुश्किल vs शिवाय - ऐ दिलसाठी फॉक्स स्टार व करण जोहरने 
दिलवाले vs बाजीराव मस्तानी - रेड चिलीज एंटरटेनमेंटने दिलवालेसाठी केली 

 

तिकिटांचे दर वाढवण्याबाबतही टाकला जातो दबाव, स्वत: सिंगल स्क्रीन मालकांनी भास्करशी बोलताना सांगितले... 
- मनोज देसाई, सिंगल स्क्रीन मालक 
'कॉर्पोरेट स्टुडिओवाले मनमानी अटी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न तर करतातच, पण आम्ही सिनेमागृह चालवतो, गवत नाही कापत. आम्हा सर्वांवर तिकिटांचे दर वाढवण्याची आणखी एक अट लादली जाते.' 
- कुमार आदर्श, यूवी टॉकीजचे मालक 
आमच्यावर दोन आठवडे 'स्टुडंट...२' सिनेमागृहांमध्ये ठेवण्याचा दवाब होता. परंतु रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच त्याने सपाटून मार खाल्ला. आम्ही आणखी एक दिवस त्यासाठी देत आहोत. रविवारपासून आम्हाला तो चित्रपट हटवावा लागेल. अजय देवगणचा 'दे दे प्यार दे'चे वितरकही तो चित्रपट आम्हाला किमान हमी या अटीवर देत आहेत. ते प्रत्येक सिनेमागृहातून चित्रपटाच्या बदल्यात ३० हजार रुपये किमान हमी घेत आहेत. हे ग्रामीण मल्टिप्लेक्सेसना लागू होत नाही. हे फक्त छोट्या सेंटर्सच्या सिंगल स्क्रीन्सना लागू होत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...