आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न पाहणाऱ्यांची नावे सांगा अन् मोठे बक्षीस मिळवा; सरकारने केली 60 लाखांपर्यंतच्या कॅशची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारतात अनेक टेलिकॉम कंपन्यांनी पॉर्न साइट्स ब्लॉक केल्या आहेत. सौदी अरेबियासह काही देशांनी अशा चित्रपटांवर बंदी सुद्धा घातली आहे. परंतु, या बंदीवर नैतिकता आणि व्यक्ती स्वातंत्र्या अशा प्रश्नांवर चर्चा सुरू असताना चीन एक पाऊल पुढे निघाला. त्यांनी पॉर्न चित्रपटांवर केवळ बंदीच लावली नाही, तर ते नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे जुगाड करून पाहता कामा नये अशी व्यवस्था केली आहे. अर्थात त्यांनी पॉर्न पाहणाऱ्यांना शोधून दंडित करण्यासाठी एक विचित्र बक्षीस योजना सुरू केली आहे. 


60 लाखांपर्यंत बक्षीस मिळवा...
- इंटरनेटवर पॉर्न चित्रपटांचा भडीमार पडलेला आहे. निर्बंध लादले तरीही आयपी अॅड्रेस लपवून किंवा दुसऱ्या काही शक्कल लढवून लोक ते डाऊनलोड करू शकतात. डिजिटल जमान्यात बंदी कुचकामी ठरत असल्याचे पाहता चीन सरकारने नवीन युक्ती केली. चीन सरकारचे इंटरनेट नियामक मंडळ पॉर्न पाहणाऱ्यांच्या तक्रारी देण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहेत. जास्तीत-जास्त तक्रारी देणाऱ्यांना किंवा त्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात मदत करणाऱ्यांना रोख स्वरुपात बक्षीस दिले जात आहे. 
- यापूर्वी चीनमध्ये अश्लील साहित्यांचा प्रचार प्रसार आणि पाहणाऱ्यांना पकडण्यात मदत करणाऱ्यांना 30 लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस दिले जात होते. तरीही अॅडल्ट कंटेन्टवर बंदी लावण्यात अपयश येत असल्याने आता बक्षीसाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. पॉर्न पाहणाऱ्यांची आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची नावे सरकारला दिल्यास सरकार त्यांना 60 लाख रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस देत आहे. 
- चीन सरकारने अश्लील चित्रपट आणि पॉर्न साइट्सला अवैध सामुग्री संबोधले आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासह पाहणाऱ्यांना सुद्धा शिक्षा दिली जात आहे. अवैध सामुग्रीचा प्रसार आणि प्रचारामुळे लोकांचे विचार गलिच्छ होत असून यात राष्ट्रहिताला नुकसान होत आहे अशी व्याख्या सरकारने केली. एवढेच नव्हे, तर यास विरोध म्हणून सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांचे अकाउंट सुद्धा बंद केले जात आहे. गेल्या काही दिवसांतच चीन सरकारने लाखो वीबो आणि वीचॅट खाते बंद केले. तसेच या कंपन्यांना दंड सुद्धा लावला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...