आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपोर्ट : अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफमुळे रखडला पीटी ऊषा यांचा बायोपिक, लवकरच होईल घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : क्वीन ऑफ इंडियन ट्रॅक या नवाने प्रसिद्ध असलेली पीटी ऊषा यांचा बायोपिक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. साउथची डायरेक्टर रेवथी हा चित्रपट बनवत आहे. फिल्मच्या कास्टिंगमधेच अडचणी येत आहेत. आधी असे ऐकिवात आले होते की, फिल्ममध्ये प्रियांका चोप्रा लीड रोल प्ले करणार आहे. नंतर या फिल्मसोबत कतरिना कैफचे नाव जोडले गेले. पण आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट आता अनुष्का शर्माकडे गेला आहे. मात्र, कास्टिंगबद्दल अद्यापही काही फायनल झालेले नाही. 

 

54 वर्षीय ऊषा 
17 वर्षांपासून एथलेटिक्स स्कूल चालवत आहे. 
04 चित्रपट रेवथीने दिग्दर्शित केले आहेत. 
03 बायोपिक एथलेटिक्सवर बॉलिवूडमध्ये बनल्या आहेत.  

 

चित्रपटाशी निगडित तीन वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत... 
अनुष्का आपल्या बॅनरमध्ये करणार आहे प्रोड्यूस... 

सूत्रानुसार, फिल्मबद्दल नवीन गोष्ट ही कळाली आहे की, फिल्मचे नरेशन अनुष्का शर्माला देखील दिले गेले आहे. आतापर्यंत तिने ही, फिल्म साइन केली नाही. पण मेकर्सने त्यासाठी तिला अप्रोच नक्की केले आहे. जर अनुष्का या फिल्मसाठी हो म्हणाली तर ती स्वतःच्याच बॅनरखाली ती प्रोड्यूसही करेल. 

कतरिना स्वतःला मानत नाही फिट... 
दुसरीकडे सूत्रांनी हे सांगितले की, कतरिनाला नरेशन दिले गेले आहे पण अद्याप तिच्याकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कदाचित कतरिना या फिल्मला यामुळे साइन नाही करत आहे कारण ती या रोलमध्ये स्वतःला फिट मानत नाही. 

 

डायरेक्टरने केले कास्टिंगच्या बातम्यांचे खंडन... 
फिल्मच्या डायरेक्टर रेवथीने अशातच एका इंटरव्यूमध्ये या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, या फिल्मच्या कास्टिंगबद्दल ज्या बातम्या येत आहेत. ते केवळ अंदाज आहेत. अजून आम्ही फिल्मवर काम करत आहोत आणि लवकरच त्याबद्दल ऑफिशियल अनाउंसमेंट करणार आहोत. 

का असेल सोपे : सुल्तानमध्ये स्पोर्ट्स पर्सनॅलिटीचा रोल केला आहे.

का सेल अवघड : आतापर्यंत कोणतीच स्पोर्ट्स फिल्म केलेली नाही. 

 

एथलेटिक्सवर बनल्या बायोपिक्स... 
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एथलेटिक्सवर तीनच बायोपिक बनल्या आहेत. या तिन्ही मेल कॅरेक्टर्सवरच बेस्ड आहे. बुधिया सिंह बॉर्न टू रन (2016), कास्ट : मनोज बाजपेयी, मयूर महेंद्रे पटोल
भाग मिल्खा भाग (2013), कास्ट : फरहान अख्तर, दिव्या दत्ता, सोनम कपूर
पान सिंह तोमर (2012), कास्ट : इरफान खान, माही गिल, विपिन शर

बातम्या आणखी आहेत...