आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Report Says As Per Saudi Crown Prince Salman Order Saudi Hacks Amazon CEO Jeff Bezos Phone

सौदीचे क्राउन प्रिंस सलमान यांनी अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांचा फोन केला हॅक; सौदी सरकारने आरोपांचे खंडन केले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टिश वृत्तपत्र द गार्जियनने मंगळवारी खुलासा केला आहे की, 1 मे 2018 ला बेजोस यांच्या मोबाईलचा डेटा चोरी गेला होता
  • 5 महीन्यानंतर बेजोस यांचे वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार आणि सौदीचे टीकाकार जमाल खशोगीची हत्या झाली
  • अॅमेझॉनने अद्याप याप्रकरणी आपली प्रतिक्रीया दिली नाही, सौदी प्रशासनाने आक्षेप घेत योग्य चौकशीची मागणी केली

रियाद- सौदी अरबने त्या सर्व रिपोर्ट्सचे खंडन केले आहे, ज्यात म्हटले होत की, 2018 मध्ये क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी एका व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा फोन हॅक केला होता. सौदी प्रशासनाने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच, या सर्व दाव्यांविरोधात योग्य चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. 

कशा झाला खुलासा? 

एका दिवसापूर्वीच ब्रिटिश वृत्तपत्र द गार्जियनने सूत्रांच्या माहितीद्वारे सांगितले की, 2018 मध्ये बेजोस यांच्या फोनवर सौदी प्रिंसच्या खासगी नंबरवरुन एक व्हॉट्सअॅप मेसेज करण्यात आला होता. या मेसेजच्या माध्यमातून बेजोसच्या फोनमध्ये व्हायरस पाठवण्यात आले, ज्यामुळे बेजोस यांचा फोन हॅक झाला. गार्जियनने सांगितल्यानुसार, या गोष्टीचा खुलासा डिजीटल फॉरेंसिक अॅनालिसीसच्या रिपोर्टमध्ये झाला होता. यात सांगण्यात आले की, एका व्हिडिओमुळे बेजोस यांच्या फोनची सेक्योरीटी तुटली.

सूत्रांनी दावा केला की, 1 मे 2018 ला बेजोस आणि प्रिंस सलमान यांच्यात बराच वेळ चर्चा झाली होती. या दरम्यान प्रिंस सलमान यांच्या अकाउंटवरुन खराब व्हायरस असलेली फाइल बेजोस यांना पाठवण्यात आली. त्यांच्या चर्चेनंतर काही तासांच्या आत बेजोस यांच्या फोनमधला महत्वाचा डेटा काढून घेण्यात आला. दरम्यान, बेजोस यांच्या फोनमधून कोणता डेटा गायब झाला, याबाबत माहिती नाही. तेव्हापासून सौदीच्या प्रिंसवर बेजोस यांच्या फोनमधील डेटा हॅक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

अॅमेझॉनने याप्रकरणी बोलण्यास नकार दिला

सौदी अरब प्रशासन आणि अॅमेझॉनमध्ये 2018 पासून मतभेद होत आहे. बेजोस अमेरिकी अखबार वॉशिंग्टन पोस्टचे मालक आहेत. प्रिंस सलमानवर आरोप आहे की, त्यांच्या आदेशावर सौदी प्रशासानाने वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या केली. तेव्हापासून बेजोस आणि प्रिंस सलमान यांच्यात मतभेद निर्माण झाले. अॅमेझॉन प्रमुखाच्या सिक्योरिटी चीफने खशोगीच्या हत्येनंतर म्हटले होती की, सौदीकडे बेजोस यांच्या फोनचा अॅक्सेस होता आणि हॅकिंगकरुन बेजोस यांची खासगी माहिती हॅक करण्यात आली. अद्याप अॅमेझॉनकडून याप्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण आले नाही.

खशोगी अमेरिकी वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टचे कॉलमिस्ट होते. त्यांना शेवटच 2 ऑक्टोबरमध्ये इस्तांबुलमधील सौदी अरब दूतावासाबाहेर पाहण्यात आले होते. तिथे ते आपल्या लग्नासाठीचे महत्वाचे कागदपत्र घेण्यासाठी गेलो होते. तुर्कीच्या सबा वृत्तपत्राने दावा केला होता की, सौदी अरबच्या एका हिट टीमने जमाल खशोगींच्या तोंडावर कपडा टाकून मारण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...