आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Report Says Google Paying 340 Rupees To Users On Street For Their Face Data May Be For The Pixel 4

रस्त्यावर फिरुन लोकांकडून फेस डेटा कलेक्ट करत आहे गूगल, त्याच्या बदल्यात देत आहे 340 रुपयांचे गिफ्ट कार्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- आपल्या नेक्स्ट जनरेशन फेशिअल रिकग्नायझेशन टेक्नोलॉजीला आणखीन चांगले बनवण्यासाठी गूगल एक नवीन पद्धत अवलंबत आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरुन गूगलचे कर्मचारी यूझर्सकडून त्यांचा फेस डेटा कलेक्ट करत आहेत. या बदल्यात गूगल त्यांना 340 रुपयांचे गिफ्ट कार्डही देत आहे. डेटा घेण्यापूर्वी यूजर्सकडून परवानगी घेतली जाते आणि एका फॉर्मवर साइनदेखील करुन घेतली जाते. कंपनी न्यूयॉर्कशिवाय अनेक शहरात याप्रकारे डेटा कलेक्ट करत आहे. रिपोर्टनुसार कंपनी हे पिक्सल 4 च्या फेस अनलॉकिंग फीचरला आणखीन चांगेल करण्यासाठी करत आहे.


डेटा देण्यासाठी युझर्सना होत नाही काही त्रास
जेडडीनेटच्या रिपोर्टनुसार गूगलच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक टीम फेस डेटासाठी लोकांकडे विचारणा करत असल्याचे पाहण्यात आले आहे. कंपनीने हा प्रकार आपल्या नवीन गूगल पिक्सल 4 च्या फेस अनलॉक फीचरला आणखीन चांगले करण्यासाठी काढला आहे.


हे कर्मचारी रस्त्यावर फिरुन सगळ्यात आधी लोकांकडून त्यांची परवानगी घेतात, हे सगळे नेक्स्ट जनरेशन फेशिअल अनलॉकिंग फीचरला आणखीन चांगले बनवण्यासाठी करत असल्याचे त्यांना सांगितले जाते. त्यानंतर त्यांना एका मोठ्या बॉक्समागे उभे केले जाते आणि त्यांचा त्या बॉस्कमागेल असलेला फोन त्यांचा फोटो घेतो. रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, हा फोन पिक्सल 4 स्मार्टफोन आहे.