आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REPORT: लंडनमध्ये दिसला नीरव मोदी, वेषांतर करून राहतो 72 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लंडन- पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोप नीरव मोदी लंडनमधील वेस्ट अॅण्‍ड भागात राहत आहे. नीरव याने वेषांतर केले असून तो 72 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे.

 

इंग्लिश वृत्तपत्र 'टेलीग्राफ'च्या रिपोर्टनुसार, नीरव राहत असलेल्या अपार्टमेंटचे तो प्रतिमहिना 15.5 लाख रुपये भाडे देतो. भारतीय अधिकार्‍यांनी नीरवचे खाते फ्रीज केले आहे. इंटरपोलने नीरवच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटिस बजावली आहे. त्यानंतरही नीरव लंडनमध्ये बिझनेस करत आहे.

 

नीरव मोदी हा 13700 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंगचा तपास करत आहे. सुरक्षितेच्या कारणामुळे भारतात येऊ शकत नाही, असे नीरव याने गेल्या महिन्यात विशेष कोर्टाला सांगितले होते.

 

रिपोर्टनुसार, लंडनमध्ये नीरवला नॅशनल इन्श्युरन्स नंबर देखील मिळाला आहे. तसेच तो ब्रिटिश बॅंकेतील अकाउंटचा वापर करत आहे.

 ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग (पीएलएलए) कोर्टात नीरवविरोधात तक्रार दाखल केली आहे. नीरवला फरार घोषित करावे, अशी मागणी ईडीने केली आहे. मात्र, ईडीच्या याचिकेवर पीएमएलए कोर्टाने नीरव यांचे स्पष्टीकरण मागितले आहे.

 

ईडीने नीरव मोदीच्या 147.72 कोटी रुपयांची मालमत्ता सीझ केली आहे. मुंबई आणि सुरतमधील मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. यात 8 कार, एक प्लॉट, मशीनरी, ज्वेलरी, पेटिंग आणि स्‍थावर मालमत्तेचा समावेश आहे.

 

ऑक्टोबर 2018 मध्ये हाँगकाँगमध्ये नीरव मोदीची 255 कोटी रुपयांची मालमत्ता ‍सीझ करण्यात आली होती. त्याआधी नीरव आणि त्याच्या नातेवाईकांची 637 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती.

 

फेब्रुवारी 2018 मध्ये पीएनबी घोटाळा समोर आला होता. त्याअाधीच नीरव मोदी विदेशात पळून गेला होता. नीरव आणि त्याचा मामा मेहुल चौकसीने बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्सच्या माध्यमातून बॅंकेतील रक्कम विदेशांत ट्रान्सफर केली.

बातम्या आणखी आहेत...