आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये भारतीयांनी फडकावला तिरंगा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश जगताप

कंदर - भारतात सर्वत्र 71 वा प्रजासत्ताक दिन आपण उत्साहात साजरा करत आहोत. परंतु परदेशातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे नोकरीच्या निमित्ताने स्थायिक असणाऱ्या भारतीयांनी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. आपण जगात कोठेही असलो तरी आपल्या मातृभूमीला विसरू शकत नाही हे त्यांनी या कृतीतून दाखवून दिले आहे. 
सिंधू कल्चरल कम्युनिटी या संस्थेच्या वतीने मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी प्रशांत राळे, हनुमंत जगताप, गंगा जाधव, समाधान गाडे, शीतल सोनवणे, अर्जुन बर्डे, हे कार्यक्रमाचे नियोजन करतात. यातील हनुमंत जगताप हे कोंढेज ता करमाळा येथील आहेत.मेलबर्न येथील करमंडस ग्राउंड सर्वजण एकत्र येतात. याठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला अभिवादन केले जाते. ढोल-ताशाच्या गजरात कार्यक्रम केला जातो. सर्वजण आपापल्या कुटुंबियांसह सहभागी होऊन याचा आनंद घेतात. पुणे, सातारा, अमरावती, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातील नागरिक एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करतात. तसेच इतरही सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. 


 या कार्यक्रमाला प्रशांत राळे, गणेश साबळे, अविनाश लंगोटे, संदीप वाडेकर, सचिन शेवकर, जितेंद्र शिंदे, देवेंद्र सूर्यवंशी, किरण देशमुख, राहुल वेलकर, गणेश भांदुर्गे, सौरभ भांदुर्गे, सिद्धार्थ भांदुर्गे, सुभाष सोनार, शिवराज वांगीकर आदी उपस्थित होते.

परदेशात असलो तरी मातृभूमीची नेहमीच ओढ


आम्ही कामानिमित्त मेलबर्न येथे स्थायिक झालो आहे. पण आपल्या महत्वाच्या सणांना विसरू शकत नाही. त्यापैकीच एक असणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. सिंधू कल्चरल कम्युनिटी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही भारतीय सण साजरे करतो. परदेशात असलो तरी मातृभूमीची नेहमीच ओढ असते. हा कार्यक्रम साजरा करून आम्हाला आनंद वाटला.
- हनुमंत जगताप, कोंढेज ता करमाळा

बातम्या आणखी आहेत...