आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Republic Day Chief Guest Jair Bolsonaro President Of Brazil Evokes Controversy In India

प्रजासत्ताक दिन 2020 चे प्रमुख पाहुणे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष; जाणून घ्या कोण आहेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसदेत महिला खासदाराशी 'रेप'ची भाषा करून जगभरात आले होते चर्चेत
  • म्हणाले होते- 'मी तुमच्यावर रेप करणार नाही, कारण तुम्ही सुंदर नाही!'

नवी दिल्ली - ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनॅरो भारत दौऱ्यावर आले आहेत. प्रजासत्ताक दिनी ते राजपथावर होणाऱ्या परेड दरम्यान मुख्य अतिथी आहेत. भारताने ब्राझीलच्या एखाद्या नेत्याला या कार्यक्रमात बोलावण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1996 आणि 2004 मध्ये ब्राझीलच्या नेत्यांना हा मान देण्यात आला होता. परंतु, यंदा भारताच्या स्वातंत्र्य दिनी मुख्य अतिथी म्हणून देशात बोलावल्या जाणाऱ्या या नेत्याच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. संसदेतच महिला खासदाराला रेपची भाषा करणारे ब्राझीलचे राष्ट्रपती कट्टर उजव्या विचारसरणीचे आहेत. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्यांच्यावर जगभरातून टीका करण्यात आली होती.

संसदेत म्हणाले होते- 'मी तुमच्यावर रेप करणार नाही, कारण तुम्ही सुंदर नाही!'

2014 मध्ये ब्राझीलच्या संसदेत ते एका विरोधी पक्षाच्या महिला नेत्यासोबत वाद-विवाद करत होते. याचवेळी त्यांनी संबंधित महिला नेत्याला उद्देशून म्हटले होते, "मी तुमच्यावर बलात्कार करणार नाही. कारण तुम्ही सुंदर नाही." याच कारणावरून जेअर बोलसोनॅरो जगभरात टीकेचे केंद्र बनले होते. त्यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव सुद्धा टाकण्यात आला. परंतु, त्यांनी माफी मागणे सोडून आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला होता.

कोण आहेत बोलसोनॅरो?

  • इटली आणि जर्मन वंशाचे असलेले जेअर बोलसोनॅरो 10 वर्षांचे असताना त्यांचे पालक ब्राझीलमध्ये स्थायिक झाले. त्यांनी करिअरची सुरुवात लष्करातून केली होती. 15 वर्षे लष्करात असताना त्यांना वेतन वाढीचा मुद्दा लावून धरला होता. यासंदर्भातील लेखामुळे त्यांना 15 दिवस तुरुंगातही राहावे लागले. यानंतर एका मॅगझीनने त्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचे आरोप केले होते. परंतु, या आरोपाच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टात गेले आणि क्लीनचिट मिळवली.
  • कट्टर राष्ट्रवादी विचारसरणीचे असलेले जेअर बोलसोनॅरो यांनी लष्करातून निवृत्ती घेऊन कट्टर उजव्या पक्षासोबत राजकीय कारकीर्द सुरू केली. जर्मनीत बंदूक संस्कृतीचे समर्थन करणे त्यांच्या प्राथमिक राजकीय मोहिमांपैकी एक होती. कट्टर उजव्या विचारसरणीचे असले तरीही त्यांचे समर्थक त्यांना सुधारणावादी मानतात. ख्रिश्चियन राइट या पक्षासोबत सुरुवातीला काम केल्यानंतर त्यांनी 2016 पूर्वीच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी सोशल लिबरल पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. बोलसोनॅरो समलैंगिक संबंधांचे कट्टर विरोधक आहेत.