आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Republic Day First Prade | Republic Day 2020; Interesting Facts History About Republic Day

तीन हजार जवान आणि शंभर विमानांनी वाढवली होती पहिल्या परेडची शान, 35 वर्षे जुन्या शाही बग्गीमध्ये बसुन आले होते भारताचे पहिले राष्ट्रपती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती होते मुख्य अतिथी

नवी दिल्ली- 1950 मध्ये भारत गणराज्य घोषित झाले. हेच पहिले वर्ष होते, जेव्हा प्रजासत्ताक दिवशी परेड निघाली होती. या परेडमध्ये सशस्त्र दलासोबत तीन हजार जवान आणि शंभर लढाकू विमानांनी भाग घेतला होता. या परेडमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद शाही बग्गीत बसुन आले होते.

संध्याकाळी निघाली होती परेड

स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गवर्नर सी. राजगोपालाचारी यांनी 26 जानेवारी 1950 ला सकाळी 10 वाजुन 18 मिनीटांवर भारताला गणराज्य घोषित केले. त्याच्या सहा मिनीटांच्या आत डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिवसाचा कार्यक्रम अधिपासूनच ठरलेला होता. दुपारी 2 वाजून 30 मिनीटांवर राजेंद्र प्रसाद बग्गीमध्ये बसुन गवर्मेंट हाउस (राष्ट्रपती भवन)मधून निघाले. कनॉट प्लेससारख्या परिसरातून चक्कर मारुन दुपारी 3 वाजुन 45 मिनीटांपर ते लाल किल्याजवळील नॅशनल स्टेडियममध्ये पोहचले.

31 तोफांनी राष्ट्रपतींना सलामी दिली

नॅशनल स्टेडियम तेव्हा इरविन स्टेडियम नावाने ओळखला जायचा. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद त्या वेळेस 35 वर्षे जुन्या शाही बग्गीत बसुन आले होते. सहा ऑस्ट्रेलियाच्या घोडे त्या बग्गीला ओढत होते. परेडस्थानावर येताच राष्ट्रपतींना 31 तोफांची सलामी देण्यात आली. पहिल्या परेडणध्ये सरकारने भारताच्या जनतेलाही सामील केले होते. 

सुरुवातीच्या पाच वर्षे परेडची जागा ठरलेली नव्हती

पहिली परेड दिल्लीतील प्रमुख भागातून जात नॅशनल स्टेडियममध्ये पोहचली. अनेक वर्षे या परेडची जागा आणि रुट ठरलेला नव्हता. 1950 ते 1954 पर्यंत परेड इरविन स्टेडियम, किंग्सवे (राजपथ), लालकिल्ला आणि रामलीला मैदानावर होत राहिली. 1955 पासून राजपथवर परेड होण्याचे ठरले.

इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती होते मुख्य अतिथी

प्रजासत्ताक दिवशी मुख्य अतिथींना बोलवण्याची परंपरा पहिल्या परेडपासून ठरली. भारत सरकार अतिथी म्हणून एखाद्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांना आमंत्रण द्यायचे. 26 जानेवारी 1950 ला पहिल्या प्रजासत्ताक दिवशी इंडोनेशियाचे राष्ट्रपती डॉ. सुकर्णो विशेष यांना मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...