MH CM / अडकलेल्यांना बाहेर काढण्यासच प्रथम प्राधान्य, मुंबईतील इमारत कोसळीच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

किमान 15 कुटुंब शंभर वर्षे जुन्या इमारतीच्या ढिगाराखाली

दिव्य मराठी

Jul 16,2019 02:24:00 PM IST

मुंबई - इमारत कोसळीच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही इमारत जवळपास शंभर वर्षे जुनी होती अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळाली आहे. सोबतच, या इमारतीच्या ढिगाराखाली किमान 15 कुटुंब दबले आहेत. सध्या त्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे हेच आपले प्रथम प्राधान्य आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. डोंगरीत मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळली. या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहेत. इमारतीमध्ये अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येने समावेश असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच, या दुर्घटनेचा सविस्तर तपास केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.

X

Recommended News