आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rescue Team Rescues Leopard Who Entered In The House At Night In Parner Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्रीच्यावेळी घरात शिरला बिबट्या, रेस्क्यु टीमने जीवित हानी होऊ न देता बिबट्याला काढले बाहेर 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर : काल रात्री दिनांक 23/11/2019 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावात श्री दिलीप जगताप यांच्या घरात कुत्र्याचा पाठलाग करीत नर बिबट घरात घुसला. जगताप यांनी स्वतः प्रकार पाहताच घराच्या दुसऱ्या बाजूने जाऊन घरातील सर्व सदस्य बाहेर काढले व दार बंद करून घेतले. श्री जगताप यांनी वनविभाग अहमदनगर यांना कळविले, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनी लगेच माणिकडोह बिबट बचाव केंद्र, जुन्नर यांना कळविले. माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीम, जुन्नर गावकरी रेस्क्यु टीम व वनविभाग टाकली धोकेश्वर यांनी संयुक्त रित्या हे ओपेशन केले. बिबट ला बेशुद्ध करून सुरक्षित रित्या बाहेर काढले. 

माणिकडोह बिबट बचाव केंद्र टीम


1. डॉ अजय देशमुख
2. धोंडू कोकणे
3. वैभव नेहरकर
4. आकाश डोळस

जुन्नर गावकरी रेस्क्यु टीम
1. विकास मोरे
2. अजिंक्य भालेराव
3. नवनाथ गायकवाड
4. सतीश घाडगे
5. करण घाडगे
6. आकाश माळी


संपूर्ण टाकळी ठोकेश्वर वनविभाग टीम तसेच पोलीस यंत्रणा उपस्थित होते.