आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान आणि निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीय अंतराळवीरांना अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनाच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी केली आहे. या नव्या इंजिनमुळे इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण जितके स्वयंपूर्ण होत जाऊ तितके ते आपल्यासाठीच हितावह असणार आहे.

गरज आहे ते संशोधन व निर्माण (Research & Development) क्षेत्रास कुठेही निधीची कमतरता पडू न देण्याची. अलीकडेच इन्फोसिसचे माजी संचालक नारायण मूर्ती म्हणाले होते की, मागील ६० वर्षांत भारताने जागतिक पातळीवर नोंद होईल असे संशोधन केलेले नाही. अशा तज्ज्ञ व्यक्तींच्या नाराजीचा सूर देशाच्या अर्थ, राजकीय निर्णय प्रक्रियेत अडकलेल्या तंत्रज्ञान क्षेत्राकडे सूचक अंगुलिनिर्देश करत आहे.
बातम्या आणखी आहेत...