आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Research | Children Up To 18 Months Should Be Allowed To Cry For A While, This Increases Their Stamina And Learns Discipline

बाळांचे रडणे क्षमता, शिस्त वाढवणारे! ब्रिटनच्या विद्यापीठाने केले बालकांच्या रडण्याचे, माता-पित्यांचे अध्ययन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रडणाऱ्या मुलाजवळ गेल्यानंतर त्याच्या वर्तनात बदल होतो
  • आई-वडिलांचे व्हिडिआे बनवले, निष्कर्ष बदलले

लंडन - तीन महिने ते १८ महिन्यांपर्यंतच्या बाळाला रडताना बघून तुम्ही त्याच्याकडे धावून जाता की त्याला काहीवेळ रडू देता? तुम्ही त्याच्याकडे लगेच धावत जात असल्यास त्याच्या विकासावर या गोष्टीचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, असा दावा ब्रिटनच्या वारविक विद्यापीठातील संशोधनातून करण्यात आला आहे.नवीन संशोधनानुसार जन्मापासून १८ महिने म्हणजेच दीड वर्षाच्या बाळाला रडताना कोणालाही बघवत नाही. परंतु, त्याला काही वेळेसाठी तसे सोडल्यास त्याची मानसिक, शारीरिक क्षमता बळकट होते. सोबतच हळूहळू तो स्वयंशिस्तही शिकू लागतो. मात्र, बाळ रडत असताना त्याच्यावर नजर जरूर असली पाहिजे, हे देखील संशोधकांनी स्पष्ट केले आहे. पोटचे बाळ रडते तेव्हा त्याची रडण्याची पद्धत, वागणे व त्या दरम्यान आई-वडिलांची प्रतिक्रिया असा या अभ्यासाचा विषय होता. संशोधकांनी ३ महिने ते १८ महिन्यांच्या सात हजारांहून जास्त मुले व आई-वडिलांचा अभ्यास केला. काही कालावधीनंतर त्यांचे सातत्याने मूल्यांकन करण्यात आले. आई-वडील हस्तक्षेप करतात की त्याला रडू देतात? हे पाहण्यात आले.या प्रयोगाचे मूल्यांकन ३, ६ व १८ महिन्यांत करण्यात आले. विलग होऊन पुन्हा भेटणाऱ्या आई-वडिलांच्या वर्तनाचेही निरीक्षण करण्यात आले. निष्कर्षानुसार बालक रडल्यानंतर लगेच त्याच्याजवळ पोहोचल्यास त्याचा विकास मंद गतीने झाल्याचे दिसून आले. काहीवेळ रडणाऱ्या मुलांमध्ये तुलनेने मानसिक, शारीरिक क्षमता जास्त चांगली दिसली. इतर मुलांच्या तुलनेत ते जास्त चंचल व सक्रिय आहेत. आई-वडिलांचे व्हिडिआे बनवले, निष्कर्ष बदलले


बालकांचे पालन-पोषण, रडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, आई-वडिलांच्या वर्तनाचा या प्रकल्पात अभ्यास करण्यात आला. डॉ. एयटन बिलगिन म्हणाले, आम्ही ३ ते १८ महिन्यांच्या बाळांच्या ७ हजारांहून जास्त मातांच्या वर्तनाचे अध्ययन केले. आई किती संवेदनशील आहे व त्याचा काय परिणाम होतो, हे पाहिले. संपूर्ण अभ्यासाचा व्हिडिआे देखील तयार करण्यात आला आहे.बातम्या आणखी आहेत...