आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचल, सिक्कीमच्या जंगलात दुर्मीळ रेड पांडावर धुळ्यातील रुणाचे संशोधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


धुळे : शहरातील हिरेन खत्री या तरुणाला पर्यावरण, जंगलावर अभ्यास करण्याची आवड होती. त्यामुळे त्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याला झुलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने रेड पांडा या प्राण्यावर संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तो अरुणाचल, सिक्कीमच्या जंगलात रेड पांडावर संशोधन करतो आहे. विशेष म्हणजे भारतात प्रथमच रेड पांडावर संशोधन होत आहे. 


शहरातील हिरेन खत्री या तरुणाला पर्यावरण व वनप्राण्यांविषयी आवड होती. सुरुवातीला काय करावे माहीत नसल्याने त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका घेतली. त्यानंतर त्याने झुलाॅजी विषयातून बी.एस्सी. केले. तसेच पर्यावरणशास्त्रात एम.एस्सी पूर्ण केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.एस्सी. करतानाच त्याने पश्चिम घाटात डॉ. वरदगिरी यांच्यासोबत सर्पांच्या जीवनाविषयी अभ्यास केला. त्यानंतर त्याची चीनमधील बीजिंग येथे जैविक संवर्धन विषयावरील प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली. त्याला बांधवगड येथेही काम करण्याची संधी मिळाली. एमएस्सीनंतर हिरेन खत्री यांनी रेड पांडा या प्राण्यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्याने कोलकाता येथील झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियातर्फे झालेल्या मुलाखतीत यश मिळवले. त्यामुळे त्याची रिसर्च स्कॉलर म्हणून पाच वर्षांसाठी निवड झाली. जगातील धाेकेदायक प्रजातीत रेड पांडा प्राण्याचा समावेश करण्यात आला आहे. जगात केवळ दहा हजार रेडपांडा शिल्लक आहेत. भारतात केवळ अरुणाचल प्रदेश, सिक्कीम व दार्जिलिंग क्षेत्रातच हा प्राणी आढळतो. अतिशय दाट जंगलात राहणारा हा प्राणी आहे. 

 

तीन जणांचा चमू 
हिरेन खत्री यांनी शहरातील जयहिंद महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. कोलकाता येथे काम करतानाच दिल्लीत अमेठी विद्यापीठात तो संशोधन करत आहे. रेड पांडा प्राण्यावरच पीएचडीचा अभ्यास करत आहे. जंगलाचे कमी होणारे प्रमाण व शिकारीमुळे ही प्रजाती धोक्यात आली आहे. भारतात प्रथमच रेड पांडावर सविस्तर संशोधन होत आहे. संशोधनात डाॅ. मुकेश ठाकूर व डॉ.रणदीप सिंग यांच्या पथकात हिरेन खत्री यांना काम करण्याची संधी मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...