आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींच्या आरोग्यावर संशोधन, दोन पृथ्वी प्रदक्षिणेसमान पदयात्रा केल्या, ३५ वर्षांत ७९ हजार किमीचा प्रवास पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ३५ वर्षांत देशभरात ७९ हजार किमी प्रवास केला. त्यांनी या अवधीत पृथ्वीला प्रदक्षिणा घातली असती तर दोन वेळा परिक्रमा पूर्ण झाली असती. गांधी शांती प्रतिष्ठानमध्ये उपलब्ध दस्तऐवज व सरकारी कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)च्या साहाय्याने गांधीजींच्या आरोग्यावर संशोधन करून अहवाल तयार केला आहे. बापूंच्या १५० व्या जयंतीनिमित्त सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. बापू दररोज सुमारे १८ किमी चालत होते. पहाटे ४.०० वाजता उठल्यानंतर ते तासभर फिरत असत तसेच रात्री झोपण्याआधीही ३० ते ४५ मिनिटे चालत होते.  

 


१९१३ ते १९४८ पर्यंत त्यांनी ७९ हजार किमीचा प्रवास केला. गांधीजींना १९२५, १९३६ आणि १९४४ मध्ये तीन वेळा मलेरिया झाला होता. याशिवाय १९१९ मध्ये त्यांच्यावर मूळव्याधीची शस्त्रक्रियाही झाली होती. चौरीचौरा घटनेनंतर १९२२ मध्ये गांधीजी जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा त्यांना तीव्र स्वरूपाची पोटदुखी झाली. तपासणीअंती १९२४ मध्ये त्यांच्यावर डॉ. मॅडोक यांनी अपेंडिक्सची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेदरम्यान वीज गुल झाल्याने कंदिलाच्या प्रकाशात ती पूर्ण करण्यात आली. ७० व्या वर्षी गांधीजींची उंची ५ फूट ५ इंच व वजन ४६.७ किलो होते. त्यांचा बॉडी मास इंडेक्स १७.१ होता.

 

 

उंचीच्या प्रमाणात त्यांचे वजन कमी होते. मात्र, हिमोग्लोबिन १४.९६ होते. त्यांचा रक्तदाब नेहमी सामान्यापेक्षा जास्त असे. मात्र, दोन वेळा(२६ ऑक्टोबर १९३७ व १९ फेब्रुवारी १९४०) त्यांचा रक्तदाब २२०/११० वर गेला होता. गांधीजी दूध पीत नव्हते. एकदा आईचे दूध प्यायल्यानंतर जेवणात दुधाची गरज लागत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. डॉक्टर व निकटवर्तीयांच्या सल्ल्यानंतरही ते दूध पीत नसत. ते संपूर्ण शाकाहारी भोजन घेत असत.

 

त्यांना तीन वेळा मलेरिया झाला, रक्तदाबही दोनदा २२०/११० वर पण तणावातही गांधीजींना कधी हृदयविकाराचा त्रास झाला नाही  
गांधीजी अॅलोपॅथी औषधाच्या विरोधात होते. त्यांचे नॅचरोपॅथी व आयुर्वेदिक औषधांना प्राधान्य असे. एवढ्या तणावातही गांधीजींना हृदयविकाराचा त्रास झाला नाही. १९३७ मध्ये काढलेल्या ईसीजीत ही बाब समाेर आली. निसर्गाच्या विरोधात गेल्यास जी गडबड होते ती निसर्गासोबत राहिल्याने सुधारते, असे त्यांना वाटे. जे लोक मानसिक कष्ट घेतात, त्यांच्यासाठी शारीरिक कष्टही खूप आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

 

बातम्या आणखी आहेत...