आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसर्च/ उपवास केल्यामुळे वाढते आयुष्य, कर्करोगासारख्या रोगांचा धोका होतो कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन मंत्र डेस्क - आधुनिक युगात उपवासासंबंधी दोन विचार समोर येतात. बु्द्धिजीवी लोक याला अंधश्रद्धेचे नाव देतात तर आरोग्याबाबत काळजी घेणार लोक उपवास शरीरासाठी चांगले काम करत असल्याचे सांगतात. पण मुळात सर्व धर्मांत उपवासाचा देवाशी संबंध जोडला आहे. अशाच उपवास फक्त देवाशी जोडण्याचे माध्यम आहे की याला वैज्ञानिक पैलू देखील आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. 


जगभरातील विविध संस्कृत्यांमध्ये उपवास करण्यात येतो. प्रत्येक ठिकाणी याचा भिन्न अर्थ आहे. सामान्य वर्गातील लोक याला धर्म आणि उत्सवांचा एक भाग मानत आले आहेत. पण विज्ञान मात्र उपवासाकडे रोगांविरुद्ध प्रभावी शस्त्र म्हणून पाहत आहेत. जर्मनीच्या डीजेडएनई आणि हेल्महोल्ज सेंटर या दोन प्रसिद्ध विद्यापीठांनी केलेल्या एक शोधात उपवासासंबंधी विविध माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी उंदरांचे दोन गट बनवले. एका गटाला उपवास घडवला तर दुसऱ्याला नाही. यानंतर जे तथ्य समोर आले ते सुखद आणि आश्चर्यचकित करणारे होते.  


शरीराला होतो फायदा 
जेवण दरम्यान दीर्घ अंतर ठेवणे, म्हणजे एक दिवस उपवास करत फक्त पाणी पिणे. ज्या उंदरांना असे करायला लावले त्यांचे आयुष्य पाच टक्के वाढले. 

 

वृद्धापकाळात केलेल्या उपवासाची फायदा होत नाही
वृद्धापकाळात शरीराची सक्रियता कमी होते. पाहण्याची आणि ऐकण्याची शक्ती दुर्बल होते. चालण्याची गती कमी होते. शास्त्रज्ञांनी वृद्धापकाळाशी निगडीत 200 अडचणींवर लक्ष दिले. यामध्ये वृद्धापकाळात उपवासाचा काहीच परिणाम झालेला दिसला नाही.  

 

नवीन पेशी निर्माण करण्यास मदत होते
सुरुवातील उपवास करताना शरीराला त्रास होतो. पण वेळेनुसार उपाशी पोटी राहण्याची सवय होते. 12 तास काहीच न खाल्लेल्या लोकांच्या शरीरात ऑटोफागी नावाची सफाईची प्रक्रिया सुरु होते. निष्क्रिय झालेल्या पेशींना शरीर आपोआप साफ करण्यास सुरुवात करते. भूख आणि उपवासामुळे नवीन पेशी निर्माण करण्यास उपयुक्त ठरते. जपानचे शास्त्रज्ञ योशिनोरी ओसुमी यांना 2016 मध्ये ऑटोफागी प्रक्रियेचे शोध लावल्यामुळे नोबेल पुरस्कार मिळाला होता. 

 

कर्करोगाच्या पेंशीची वाढ मंदावते
बहुतांश वेळा उंदरांच्या मृत्यूमागे कर्करोगाचे कारण आहे. शास्त्रज्ञांनी कँसर पीडित उंदरांचे दोन गट बनवले होते. एकाला उपवास घडवला तर दुसऱ्याला नाही. तपासाअंती उपाशी राहिलेल्या उंदरांच्या शरीरातील कँसरच्या पेशींची मंद गतीने वाढ झाली. उपवास करणारे उंदीर 908 दिवस जिवंत राहिले. तर सतत खात असलेले उंदीर 806 दिवस जगू शकले.  

 

औषधाप्रमाणे काम करते उपवास 
उपवासामुळे आयुष्य वाढते. मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. पण उपवासाचा वृद्धापकाळात काहीच फायदा होत नाही. शास्त्रज्ञांच्या मते वृद्धापकाळातील अडचणी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. 

बातम्या आणखी आहेत...