आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिगारेटपेक्षा जास्त हानिकारक आहे अगरबत्तीचा धूर, कॅन्सरसाठी ठरू शकतो कारणीभूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - भारतीय संस्कृती आणि प्रामुख्या हिंदु परंपरेमध्ये देवी देवतांच्या पुजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या पुजेमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अगरबत्ती असल्याने अगरबत्तीलाही मोठे महत्त्व आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक शांतता आणि समाधानासाठी अगरबत्ती महत्त्वाची समजली जाते. खरं तर अगरबत्तीच्या सुगंधामुळे आत्मिक समाधान मिळत असल्याने एक वेगळे समाधान मिळत असते. पण याची एक काळी बाजूही आहे. कारण अगरबत्तीच्या धुराचे दुष्परिणाम पाहता, हा धूर सिगारेच्या धुरापेक्षा जास्त घातक ठरू शकतो असे समोर आले आहे. 


2015 मध्ये चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार जेव्हा अगरबत्ती जळत असते त्यावेळी धुराबरोबर काही अतिसूक्ष्म कण त्या धुराबरोबर बाहेर पडतात आणि ते हवेमध्ये मिसळले जात असतात. त्यामुळे सुगंध येणाऱ्या अगबत्तीमधील हे सूक्षम कण शरिरासाठी हानिकारक ठरून अंतर्गत अवयवांचे नुकसान किंवा रोगास कारणीभूत ठरू शकतात. 

 

 

बातम्या आणखी आहेत...