आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांनी केली याला साप समजण्याची चूक, पण नंतर समोर आले सत्य, आहे दुर्मिळ भयावह जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैपेई - तैवानला लागून असलेल्या समुद्र किनाऱ्यावर संशोधकांना एक भयावह जीव आढळला होता. सुरुवातीला संशोधन करणाऱ्या टीमला वाटले की हा साप आहे. पण नंतर लवकरच त्याचे सत्य समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. रिसर्च टीमच्या मते, हा साप नव्हता तर एक व्हायपर शार्क होता. हा व्हायपर शार्क अत्यंत दुर्मिळ आहे. एवढा दुर्मिळ की यापूर्वी तो 1986 मध्ये तो पकडला गेला होता. त्यानंतर तो कोणाच्याही हाती आला नाही. 


जबड्याबाहेर काढू शकतो दात 
या भयावह शार्कचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे हा  त्याचे दात जबड्याबाहेर काढू शकतो. 


सुईपेक्षा जास्त पातळ आणि टोकदार दात 
Taiwans Fisheries Research Institute च्या एका अधिकाऱ्याच्या मते, या शार्कचे दात सुईपेक्षा बारीक आणि टोकदार असतात. जबड्याबाहेर दात काढून हल्ला करण्याच्या वैशिष्ट्यामुळे आपल्यापेक्षा अनेकपटीने मोठ्या माशाचा शिकार हा शार्क करू शकतो. 


जपानमध्ये पहिल्यांदा आढळला होता 
1986 मध्ये सर्वात आधी जपानच्या शिकोकू बेटावर हा शार्क पकडला गेला होता. तेव्हा त्याचे साइंटिफिक नाव Trigonognathus kabeyai ठेवण्यात आले. पण याच्या भयावह लूकमुळे याला एलियन फिश आणि फिश फ्रॉम हेल (नरकातील मासा) असेही म्हणतात. हा शार्क पाण्यात एक ते दीड हजार फूट खोलीवर राहतो. पण शास्त्रज्ञांकडे अजूनही याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. 

बातम्या आणखी आहेत...