आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनपीएबाबत रिझर्व्ह बँकेचा इशारा, 2018-19 मध्ये 2.68% मुद्रा कर्ज व एनपीए

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम.के. जैन यांनी मुद्रा करारांतर्गत वाढत असलेल्या नॉन-परफॉर्मिंग अॅसेटच्या (एनपीए) प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, बँकांनी मुद्रा कर्जावर बारीक नजर ठेवली पाहिजे. बँकांनी मंजुरी पातळीवरच पेमेंट क्षमतेवर लक्ष केंद्रित करतानाच कर्जाच्या पूर्ण चक्रावर जवळून देखरेख केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१५ मध्ये मुद्रा कर्ज याेजना सुरू केली हाेती. कमी निधी असलेल्या लहान व मध्यम उद्याेगांना स्वस्तात बँक कर्ज उपलब्ध करून देण्याचा या याेजनेचा उद्देश आहे. जैन म्हणाले, मुद्रा योजनेअंतर्गत अनेक लाेकांना गरिबीतून बाहेर काढता येऊ शकले असते, परंतु यामध्ये एनपीएची प्रकरणे वाढत आहेत.२०१८- १९ मध्ये मुद्रा कर्जाच्या तुलनेत नाॅन परफॉर्मिंग अॅसेट वा बुडीत कर्जाचे प्रमाण २.६८ टक्के हाेते. तेे २०१७-१८ मध्ये २.५२ टक्क्यांच्या तुलनेत १६ बेसिस पाॅइंटने वाढले आहे. दिल्या गेलेल्या १८.२६ काेटी रुपयांच्या मुद्रा कर्जापैकी ३६.३ लाख खाती ३१ मार्चला डिफॉल्ट झाली. जैन म्हणाले, नियंत्रकांनी आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञाचा उपयाेग करताना धाेके आणि आव्हाने आहेत. हे धाेके सुरुवातीलाच समजून घेतले पाहिजे व संबंधित नियामक संस्थांना भेडसावणारी आव्हाने कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलले तरच तंत्रज्ञानाचा पूर्ण उपयाेग करता येऊ शकेल, याकडे जैन यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...