आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझ‌र्व्ह बँक सरकारला देणार १.७६ लाख कोटी; सरकारला वित्तीय तूट न ‌वाढवता मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यास होणार मदत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आपल्या लाभांश आणि अतिरिक्त राखीव निधीतून सरकारला १.७६ लाख कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ८४ वर्षांच्या इतिहासात ही सर्वात मोठी रक्कम आहे. केंद्रीय बँकेच्या या निर्णयामुळे मोदी सरकारला वित्तीय तूट न ‌वाढवता मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यास मदत होणार आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील रिझर्व्ह बँक मंडळाने सोमवारी १,७६,०५१ कोटी रुपये सरकारकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली. याच २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अतिरिक्त निधीतील १,२३,४१४ कोटी आणि सुधारित आर्थिक भांडवली संरचनेच्या (ईसीएफ) माध्यमातून ५२,६३७ कोटी रुपयांचा समावेश आहे. अतिरिक्त राखीव निधी सरकारला देण्याची शिफारस माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या समितीने केली होती.