आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीनंतरही धरणांतील जलसाठा २९ टक्के; पावसाची सरासरी ५० टक्के

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दाेन दिवसांपूर्वी जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने सरासरी गाठली असली तरी जळगाव जिल्ह्यातील अाठ प्रकल्प कोरडे आहेत. पावसाने वार्षिक सरासरीची पन्नाशी पार केली असून माेठे, मध्यम अाणि लघुप्रकल्पातील साठा २९ टक्क्यांपर्यंत पाेहोचला अाहे. 


जिल्ह्यातील बहुतांश भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असला तरी ३ माेठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्पांमुळे दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी त्याची मदत होते. चांगला पाऊस झाला तर तुडुंब भरलेले हे प्रकल्प दुष्काळ पळवून लावतात. या वर्षी मात्र अाॅगस्टचा पहिला पंधरवडा लाेटूनही पाऊस, जलसाठ्याची स्थिती चांगली नाही. देशातील अनेक भागांत पावसाने थैमान घातले असताना उत्तर महाराष्ट्रात मात्र त्या उलट स्थिती अाहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिके हातची गेली अाहे. १६ अाॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ३९ वरून ५२ टक्क्यांवर गेली. मध्यम प्रकल्पांपैकी अग्नावती, हिवरा, बहुळा, ताेंडापूर, भाेकरबारी, बाेरी, मन्याड व अंजनी या ८ प्रकल्पांत पाणीसाठा शून्य टक्के अाहे. अर्धा पावसाळा संपला तरी जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाची जलपातळी अद्याप फारच कमी अाहे. 


पावसाची सरासरी टक्केवारी 
जिल्ह्यात १६ अाॅगस्ट राेजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या पुढे गेली अाहे. गेल्या अाठवड्यात ३९ टक्क्यांवर असलेला पाऊस ५२ टक्के एवढा झाला अाहे. त्यात वार्षिक सरासरीत जळगाव ५०.६ टक्के, जामनेर ४४.४ टक्के, एरंडाेल ६८.२ टक्के, धरणगाव ६७.३ टक्के, भुसावळ ४१.३ टक्के, यावल ४३.३ टक्के, रावेर ५२.१ टक्के, मुक्ताईनगर ४४.२ टक्के, बाेदवड ५७.४ टक्के, पाचाेरा ५० टक्के, चाळीसगाव ५१.४ टक्के, भडगाव ४७.५ टक्के, अमळनेर ४६.९ टक्के, पाराेळा ६६.५ टक्के, चाेपडा तालुक्याची टक्केवारी ५२.१ टक्के एवढी झाली अाहे. 


अशी अाहे स्थिती 
माेठे प्रकल्प ३४ टक्के 
हतनूर ४० टक्के 
गिरणा ३०.३४ टक्के 
वाघूर ३६ टक्के 


मंगरुळ, सुकी १०० % भरले 
मध्यम प्रकल्प ३०.२१ टक्के भरले अाहेत. त्यात अभाेरा ६३.९७ टक्के, माेर २५.९० टक्के, गूळ ४१ टक्के, मंगरूळ १०० टक्के, सुकीत १०० टक्के साठा झाला अाहे. तर अग्नावती, हिवरा, बहुळा, ताेंडापूर, भाेकरबारी, बाेरी, मन्याड, अंजनी या धरणात शून्य टक्के साठा अाहे. जिल्हाभरात लघु प्रकल्पांची संख्या ९३ अाहे. त्यात ३.७८ टक्के पाणीसाठा अाहे. 

बातम्या आणखी आहेत...