आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Resident Doctor Assaulted With Patient In Ward 1 C Of Sms Hospital Jaipur Video Viral

जयपूरच्या एसएमएस हॉस्पीटलमधील वार्डात डॉक्टराने रूग्णाला बेडवर चढून केली मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर(राजस्थान)- येथील सगळ्यात मोठे रूग्णालय असलेल्या एसएमएसच्या एका वार्डात रेजीडेंट डॉक्टराने रूग्णाला बेदम मारले. दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, डॉक्टर बेडवर चडून रूग्णाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हॉस्पीटल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. हा व्हायरल व्हिडिओ मानवाधिकार आयोग आणि आरोग्य मंत्र्यांपर्यंतही पोहचला आहे. त्यांना या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

 

 


इतका राग आला की, बेडवरच चढून लाथा-बुक्क्याने मारले
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मारहाण करणाऱ्या डॉक्टराचे नाव सुनील आहे. तर, हा व्हिडिओ एसएमएस हॉस्पीटलच्या वार्ड नंबर 1-सीमधला असल्याचे बोलले जात आहे. असे सांगण्यात येत आहे की, रूग्णाची डॉक्टरासोबत छोट्याशा गोष्टीवरून वाद झाला होता.


यामुळे राग आलेल्या रेजीडेंटची रूग्णाच्या नातलगांसोबत बाचा-बाची झाली आणि त्यानंतर हा वाद वाढून रूग्णाला मारहाण करण्यात आली. तो बेडवर चढून रूग्णाला लाथा-बुक्यांनी मारहाण करू लागला. यादरम्यान एप्रेनमध्ये आलेल्या एका दुसऱ्या डॉक्टराने रेजीडेंटला थांबवण्याचा प्रयत्न केला.


त्यावेळी उपस्थित असलेल्या इतर रूग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टराला थांबवण्याऐवजी घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला. एकाने या व्हिडिओसोबत हेही लिहीले की, बघा एसएमएस हॉस्पीटलमध्ये रूग्णासोबत कशी मारहाण करण्यात येते. 


व्हिडिओ गांभीर्याने घेत मानवाधिकार आयोगाने 25 जूनपर्यंत प्रकरणाची रिपोर्ट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तर, मोतीडूंगरी पोलिस स्टेशनमधील पोलिसांचे म्हणने आहे की, यात कोणीच तक्रार दाखल केलेली नाहीये.