आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावात होते सापांची शेती, प्रत्येकाकडे जवळपास 3 हजार सांप, कोट्यधीश बनले आहेत लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या गावात मोठ्या प्रमाणावर साप आहेत. - Divya Marathi
या गावात मोठ्या प्रमाणावर साप आहेत.

झेजियांग - चीनच्या झेजियांग प्रांतात एक असे गाव आहे, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साप पाळले जातात. या गावाचे नाव आहे जिसिकियाओ. याठिकाणचे बहुतांश लोक हेच काम करतात. येथील लोकसंख्या जवळपास 1000 असून येथे सुमारे 30 लाख साप पाळले जातात. त्यांचा वापर खाण्यापासून ते औषधी तयार करणे यासाठी होतो. हेच येथील लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधनही आहे आणि आता त्याने व्यवसायाचे रुप घेतले आहे. लोक घरात अनेकप्रकारचे साप पाळतात त्यापैकी अनेक विषारी असतात. 


व्यक्तीमागे 3000 साप 
- चीनमधील सापाची मागणी पाहता, येथील जास्तीत जास्त लोक सापांचा व्यवसाय करू लागले आहेत. येथे 100 हून अधिक स्नेक फार्म सुरू झाले आहेत. 
- गावात जेवढे लोक आहेत त्यापेक्षा अनेक हजार पट अधिक साप आहेत. येथे एक हजार लोक आणि 30 लाख साप आहेत. म्हणजे व्यक्तीमागे सरासरी तीन हजार साप. 
- उन्हाळ्यात सापांच्या अंड्यांमधून पिले बाहेर येतात त्यावेळी येथे सगळीकडे सापच भरलेले असतात. यात जगातील अनेक विषारी सापही आहेत. 
- या सापांचा वापर हॉटेलमध्ये मांसासाठी आणि पारंपरिक चिनी औषधे तयार करण्यासाठी होतो. चीनमध्ये सापापासून बनलेले पदार्थ लोक आवडीने खातात. 


बंपर कमाई 
- जिसिकियाओ गावात सापांपासून कोट्वधींचा व्यवसाय होतो. या गावात 80 च्या दशकापासून साप पाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यावेळी गावाची कमाई वर्षाकाठी 1 लाख युआन (10 लाख रुपये ) एवढी असायची. 
- वेळेबरोबर हळू हळू या व्यवसायामध्ये वाढ झाली आणि आता त्याने एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचे रुप घेतले आहे. त्याचा गावावर सकारात्मक परिणाम झाला आहे. 
- सध्या ही इंडस्ट्री 8 कोटी युआन (80 कोटी रुपये) एवढी झाली आहे. लवकरच ती 100 मिलियन युआनवर जाईल असे तज्ज्ञांचे मत आहे. 


फक्त एका सापाला घाबरतात लोक 
- येथे सर्वाधिक बिनविषारी साप पाळले जातात. पण त्याशिवाय कोबरा, अजगर, व्हायपर, रॅटल अशा सापांचाही समावेश आहे. 
- येथील लोक सापांना घाबरत नाही, पण एका सापाचे नाव ऐकताच ते घाबरतात. तो म्हणजे 'फाइव्ह स्टेप'. 
- याच्या फाइव्ह स्टेप नावामागेही एक कता आहे. हा साप चावल्यानंतर माणसाला पाच पावलेही चालता येत नाही, असे समजले जाते. लगेच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. म्हणून या सापाला फाइव्ह स्टेप म्हटले जाते. 


असे मारतात सापाला 
- येथून सापाचे मांसही सप्लाय केले जाते. सापांना मारण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धत वापरली जाते. 
- मारण्यापूर्वी त्याचे विष काढले जाते. त्यानंतर त्याचे डोके दोऱ्याने शिवतात नंतर डोके कापून मांस काढतात. त्यानंतर त्याचे इतर अवयव वेगळे करतात. 
- सांपाची कातडी वेगळी करून वाळवली जाते. नंतर इतर वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 

 

बातम्या आणखी आहेत...