आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची सत्ता असलेल्या सेलू नगरपालिकेत सीएए व एनआरसी विरोधात ठराव संम्मत

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेनं केला ठरावास विरोध, भाजपचे नगराध्यक्ष बोराडेसह इतर नगरसेवकांनी दिला पाठिंबा

परभणी- केंद्र शासनाने केलेला नागरीकत्व दुरुस्ती कायदा हा भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या विरोधी असुन या कायद्यामुळे व प्रस्तावित स्वरुपातील एन.पी.आर. तसेच संभावित एन.आर.सी. या बाबींबद्दल सर्वसामान्य व गोर गरीब मजुर वर्गाच्या मनात संशयाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले असुन या विरोधात देशभरात वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलन चालू आहेत. असे मत मांडत, भाजपची सत्ता असलेल्या सेलू नगरपालिकेमध्ये याविरोधात एक ठराव मंजुर झाला आहे.

सेलू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात 21 जानेवारीपासुन शाहीनबागच्या नावाने संध्याकाळी 7 ते रात्री 10 दरम्यान धरणे आंदोलन चालू आहे. या सर्व आंदोलनामागील जनभावना लक्षात घेऊन सेलू नगरपरिषद भाजपचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सदरील बाबीवर चर्चा करण्यासाठी 28 फेब्रूवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. या सर्वसाधारण सभेत सि.ए.ए., एन. पी . आर , एन. आर. सी. या बाबींवर चर्चा होऊन महाराष्ट्र शासनाने याबाबी राज्यात लागू करू नये अशी शिफारस करण्याचा ठराव मंजूर झालाय.

घेण्यात आलेल्या ठरावाची एक प्रत शाहीनबाग सेलू येथे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी संविधानबचाव समिती सेलूचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आढळकर व शाहीनबाग संयोजन समिती यांना 29 फेब्रुवारीला रात्री सुपूर्द केली. या प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, नगरसेवक शेख रहीम, शेख अय्युब भाई, अजिम कादरी, पठाण रहीम खान, अ. वहीद अन्सारी, शेख कासिम भाई,  विठ्ठल काळबांडे, माजी नगराध्यक्ष पवन आढळकर, जकी सर, आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...