आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर बारच्या सभेत पाच न्यायाधीशांच्या निषेधाचा ठराव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर- बार असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी प्रमुख जिल्हा न्यायाधीश संवाद ठेवत नाहीत, वकिलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, अशी काही कारणे देत सोलापूर बार असोसिएशनने प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अाणेकर व चार न्यायाधीशांचा निषेध बारच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला, अशी माहिती बारचे अध्यक्ष संतोष न्हावकर यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली. 


बार असोसिएशन व पदाधिकारी यांच्याशी संवाद ठेवत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयासमोर बारची चुकीची प्रतिमा निर्माण केली. तसेच उच्च न्यायालयाने बार असोसिएशनच्या समस्येबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती बारला कळवली जात नाही. प्रशासकीय निर्णय बारशी संबंधित असतील तर बारला विश्वासात घेतले जात नाही. यामुळे मुख्य न्यायाधीश आणेकर यांचा निषेध नोंदवण्यात आला. 


लोकअदालतमध्ये बार असोसिएशनने बहिष्कार टाकलेला होता. तरीही माध्यमांमध्ये त्याची बातमी देताना तालुक्यातील निकाली आकडेवारी दाखवली, असेही ठरावात म्हटले आहे. लोकअदालत दरम्यान, बारच्या पदाधिकाऱ्यांशी योग्य वर्तन केले नाही. त्यामुळे न्यायाधीश एस. एस. माने, न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी, न्यायाधीश व्ही. जी. मोहिते, न्यायाधीश जोशी या न्यायाधीशांच्या निषेधाचा ठरावही मंजूर करण्यात आला. लोकअदालतीच्या कामकाजात सहभाग न घेण्याचे ठरलेले असताना १२ वकिलांनी त्यात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या. पालक न्यायाधीश (गार्डियन जस्टिस) यांना भेटून समस्यांचे निराकरण करून घेण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. 


गाऱ्हाणे वर मांडण्यापूर्वीच केला निषेधाचा ठराव... 
आठ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालत कामकाजापासून अलिप्त राहू नका, असे आवाहन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. ओक यांनी दूरध्वनीद्वारे बारच्या पदाधिकाऱ्यांना केले होते. पण बारचा ठराव अगोदरच झाला असल्याने बारने त्यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला नाही. सोमवारच्या झालेल्या बैठकीत श्री. ओक व पालक न्यायमूर्ती यांची भेट घेऊन बारचे गाऱ्हाणे मांडण्याचे आजच्या बैठकीत ठरले. परंतु वरिष्ठांकडे गाऱ्हाणे मांडण्यापूर्वीच निषेधाचा ठराव केला. 

बातम्या आणखी आहेत...