आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूज्य गांधीजी सामाजिक समता व समरसतेचे अनुयायी होते, आपण सगळ्यांनी त्यांचे अनुकरण करायला हवे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत देशाच्या आधुनिक इतिहासात आणि स्वतंत्र भारताच्या प्रगतीच्या कथेत ज्या महामानवांची नावे नेहमीसाठी नोंदली गेली आहेत, जे सनातन काळापासून चालत आलेल्या भारताच्या इतिहासातील पर्व बनतील, त्यात पूज्य महात्मा गांधी यांचे नाव प्राधान्याने राहील. भारत अध्यात्मिक देश आहे आणि आध्यात्मिकतेच्या आधारावरच त्याची प्रगती होईल. याला आधार बनवून भारतीय राजकारणाला आध्यात्मिकतेच्या पायावर उभे करण्याचा प्रयोग महात्मा गांधींनी केला. सत्तेच्या राजकारणापुरतेच गांधीजींचे प्रयत्न नव्हते. समाज आणि त्याच्या नेतृत्वात सात्त्विक आचरण निर्माण करण्यावर त्यांचा भर होता. महत्त्वाकांक्षेने आणि स्वार्थाने प्रेरित, अहंकार आणि विकारांच्या आधारावर असणारे देशांतर्गत आणि जागतिक राजकारणाला त्यांनी पूर्णपणे नाकारले होते. सत्य, अहिंसा, स्वावलंबन आणि मनुष्याच्या खऱ्या स्वातंत्र्यावर आधारित भारतातील जनजीवन असावे, देश आणि मानवतेसाठी हेच त्यांचे स्वप्न होते. गांधीजींचे हे चिंतन त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे साकारले होते. १९२२ मध्ये गांधीजींना अटक झाल्यानंतर नागपूर शहर काँग्रेसने एक सभा आयोजित केली होती. त्या सभेत मार्गदर्शन करताना डॉ. हेडगेवार यांनी 'पुण्यपुरुष' विशेषणाने संबोधित करत म्हटले होते की, गांधीजींच्या वागण्यात आणि बोलण्यात फरक नव्हता. जीवनात धैर्य आणि विचारांसाठी सर्वस्व त्याग करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांनी सांगितले की, गांधीजींचे गुणगान करून गांधीजींचे कार्य पुढे जाणार नाही. गांधीजींच्या विचारांचे आपल्या जीवनात अनुकरण केले तर गांधीजींचे कार्य पुढे जाईल. पारतंत्र्यामुळे येणारी गुलामगिरीची मानसिकता किती नुकसान करणारी आहे हे गांधीजींना माहीत होते. त्या मानसिकतेतून मुक्त, शुद्ध स्वदेशी दृष्टीतून भारताच्या विकास आणि आचरणाचे एक स्वप्नचित्र त्यांनी 'हिंद स्वराज'मध्ये लिहिले आहे. त्या वेळच्या जगात सर्वांना अचंबित करणारी भौतिकतेमुळे विजयी पाश्चात्त्य जगत, संपूर्ण जगात आपल्या पद्धती आणि शैलीला, सत्तेच्या बळावर शिक्षणाचे विकृतीकरण करत आर्थिक दृष्टीने सर्वांना आपले आश्रित करण्याचा प्रयत्न करत पुढे जात होते. अशा वेळी गांधीजींचे प्रयत्न स्वत्वाच्या आधारावर जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये एक नवीन विचार देण्याचा एक यशस्वी प्रयोग होता. मात्र, मानसिक गुलामीत असणारे कोणताही विचार न करता पश्चिमेतून आलेल्या गोष्टींना प्रमाण मानत आपले पूर्वज, पूर्वीचा सन्मान, आधीच्या संस्कारांना कमी मानून अंधानुकरण आणि चाटुगिरी करण्यात लागले. त्यांचा मोठा प्रभाव आजही भारताची दिशा आणि दशेवर दिसतो. इतर देशांमधील समकालीन महापुरुषांनीही गांधीजींच्या भारतकेंद्री विचारातील काही अंश स्वीकारत आपल्या देशाच्या विचारांमध्ये योगदान दिले. आइन्स्टाइनने तर गांधीजींच्या निधनानंतर म्हटले होते की, येणाऱ्या पिढीला विश्वास बसणार नाही की, अशी एखादी व्यक्ती भूतलावर होती. एवढे पवित्र आचरण आणि विचार गांधीजींनी आपल्या जीवनातून समोर ठेवले.

गांधीजींची संघाच्या शिबिराला भेट
गांधीजी १९३६ मध्ये वर्ध्याजवळील संघाच्या शिबिरात आले होते. दुसऱ्या दिवशी डॉ. हेडगेवार यांची गांधीजींच्या निवासस्थानी भेट झाली. गांधीजींसोबत त्यांची चर्चा आणि प्रश्नोत्तरे झाली, जी प्रकाशित आहेत. फाळणीच्या रक्तरंजित दिवसांमध्ये दिल्लीतील त्यांच्या घराजवळील शाखांमध्ये गांधीजींचे येणे-जाणे होते. त्यांचे बौद्धिक वर्गही संघ शाखेत झाले होते. त्याचे वृत्त २७ सप्टेंबर १९४७ च्या 'हरिजन' मध्ये छापून आले होते. संघाच्या स्वयंसेवकांची शिस्त आणि जातीपातीची विघटनकारी संवेदना त्यांच्यात नसल्याचे पाहून गांधीजींनी आनंद व्यक्त केला होता. 'स्व' च्या आधारावर भारताच्या पुनर्रचनेचे स्वप्न पाहणारे, सामाजिक समता आणि समरसतेचे अनुयायी, आपल्या विचारांना आचरणात आणणारे, सर्वांसाठी आदर्श पूज्य गांधीजींना आपल्याला पाहून, समजून आचरणात आणायला हवे. त्यांच्या याच सद॰गुणांमुळे गांधीजींच्या विचारांशी किंचित मतभेद असणारेही त्यांच्याकडे श्रद्धेने बघतात.

अनुसरणाचा संकल्प करूया
त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत आपण सर्वांनी संकल्प करायला हवा की, त्यांचे पवित्र, त्यागमय, पारदर्शी जीवन आणि स्वआधारित जीवनदृष्टीचे अनुसरण करत आपणही विश्वगुरू भारताच्या रचनेसाठी आपल्या जीवनात समर्पण आणि त्यागाची भावना आणावी.

संघाच्या प्रार्थनेत रोज गांधीजींचे नामस्मरण केले जाते
संघाच्या वर्गात दररोज सकाळी एका स्तोत्रात महापुरुषांच्या परंपरेचे स्मरण करण्याची प्रथा संघाच्या स्थापनेपासूनच आहे. १९६३ मध्ये यात काही नावे जाेडली गेली. तोपर्यंत पूज्य गांधीजी दिवंगत झाले होते. त्यांचे नावही त्यात जोडण्यात आले. सध्या त्याला 'एकात्मता स्तोत्र' म्हटले जाते. संघाचे स्वयंसेवक रोज सकाळी एकात्मता स्तोत्रामध्ये गांधीजींच्या नावाचे स्मरण करतात.
 

बातम्या आणखी आहेत...