आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Responding To The Rangoli, Tapasi Said "Even If I Don't No Acting, I Am Getting Films, What To Do."

​​​​​​​तापसीने दिले रंगोलीला उत्तर, म्हणाली - "अभिनय येत नाही तरीदेखील चित्रपट मिळत आहेत, काय करू."

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोटची बहीण रंगोली आणि तापसी पन्नू यांच्यामधील कॅट फाईट थांबण्याचे नावाचं घेत नाहीये. यावेळी तापसीने रंगोलीच्या अभिनयही निगडित वक्तव्यावर पलटवार करत लिहिले की, "हो अभिनय नाही येत तरीही चित्रपट करत आहे, काय करू, आपण डायरेक्टर्सला प्रश्न विचारला पाहिजे की, का ते माझ्याकडे येत असतात." यापूर्वी रंगोलीने तापसीबद्दल म्हणले होते की, अभिनयाचा 'अ' देखील येत नाही आणि दिग्गजांसोबत स्वतःला जोडत आहेत." मात्र यापूर्वीही रंगोली अनेक लोकांना असेच ट्विटर हँडलवर निशाण्यावर घेतले आहे.

चॅट शोदरम्यान तापसीने रंगोलीला दिले उत्तर, भूमीनेही दिली साथ... 
एका चॅट शोमध्ये पोहोचलेल्या "सांड की आंख" च्या स्टार्स तापसी पन्नू आणि भूमी पेडनेकर यांना रंगोलीबद्दल प्रश्न केला गेला तर त्या चेष्टेत म्हणाल्या.  तापसी म्हणाली, "हो अभिनय नाही येत तरीही चित्रपट करत आहे, काय करू, आपण डायरेक्टर्सला प्रश्न विचारला पाहिजे की, का ते माझ्याकडे येत आहेत, मला माफ करा मी सध्या काही चार चित्रपट साइन केले आहेत, तर आता तुम्हाला सहन करावेच लागेल." एवढेच नाही तर यावर भूमीनेदेखील रंगोलीची निंदा करत म्हणले, "खरे आहे, ऑडियन्स सुद्धा मूर्ख आहे."

कंगनाची बहीण रंगोली चंदेलने वयस्कर महिलांची भूमिका केल्याबद्दल तापसीवर निशाणा साधला होता. रंगोलीने आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, स्वस्त प्रोस्थेटिक आणि पांढरे केस लावून अॅक्टर नाही बनणार, 60 वर्षांच्या महिलेची बॉडी लँग्वेज आणि आवाजाचे काय करणार ? अॅक्टिंग कुठे आहे ?" हरियाणा येथील सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडनेकरने 60 वर्षांच्या महिला शार्पशूटर्सच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

सध्या तापसी आणि भूमी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...