आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील आठवड्यात खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांनी शपथ घेऊन नऊ दिवस झाले तरी खातेवाटपाचा तिढा कायम असल्याने शुक्रवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. दरम्यान, पुढील आठवड्यात हा तिढा सुटण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेवर आली खरी, परंतु महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवण्याच्या कुरघोडीवरून खातेवाटप होत नव्हते. शपथ घेतलेल्या मंत्र्यांनाही काय काम करावे हे समजत नव्हते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खातेवाटप व नव्या मंत्र्यांच्या नावांबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. संजय राऊत व शरद पवार यांच्यातही दिल्लीत बैठक झाली होती. मात्र, कोणताही निर्णय होत नव्हता. अखेर तिढा लवकर सुटावा म्हणून शुक्रवारी ही बैठक झाली.

अजित पवार उपमुख्यमंत्री?
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुण्याला जायचे असल्याने तासभर बैठक घेऊन ते निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू होती. पुन्हा एकदा अशीच बैठक होऊ शकते. शिवाय अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...