Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | restaurant food eating information in Marathi

रेस्तराँमध्ये हे खाणे या कारणांमुळे टाळले पाहिजे

दिव्य मराठी | Update - Mar 17, 2019, 12:01 AM IST

अनेक रेस्तराँ 'आजचा विशेष मेनू’ ठेवतात. बरेचदा अशा प्रकारचा मेनू सायंकाळपर्यंत एखादी डिश संपवण्यासाठी ठेवला जातो....

 • restaurant food eating information in Marathi

  1. गार्निशिंग
  ज्यूस किंवा मॉकटेल ऑर्डर केल्यास त्यावरील पायनॅपल, लेमन किंवा मिंट लीव्हज गार्निश खाणे टाळावे. शोध असे सांगतात की, ग्लासवर सजवण्याआधी ती व्यवस्थित धुतली जात नाहीत. त्यामुळे त्यावर विषाणू राहण्याची मोठी शक्यता असते.


  2. कच्च्या भाज्या
  बरेचदा सँडविच आणि बर्गरला क्रंची बनवण्यासाठी त्यांच्या आत कच्च्या भाज्या टाकल्या जातात. उदा. कच्ची पत्ताकोबी, कडधान्यं आदी. ते उगवण्यासाठी दमट हवामानाची गरज असते. अनेक धोकादायक विषाणू याच तापमानात वाढतात. रेस्तराँमध्ये कच्च्या भाज्या खाणे अवश्य टाळावे.


  3. नळाचे पाणी
  अनेक रेस्तराँमध्ये ग्राहक येण्याआधीच टेबलवर पाण्याचे ग्लास ठेवले जातात. ते पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. रेस्तराँमध्ये नेहमी बाटलीबंद पाणी मिळण्यासाठीच आग्रह धरावा. ग्लासमध्ये आधी ठेवलेले पाणी पिणे टाळावे.


  4. ब्रेड बास्केट
  रेस्तराँमध्ये बरेचदा ब्रेड बास्केट एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर पास केली जाते. त्याचा अर्थ असा की, ती अनेकांच्या हातांतून तुमच्या टेबलपर्यंत पोहोचते. शेंगदाणे आणि टेबलवर ठेवलेल्या इतर मोफत पदार्थांबाबतही असेच होते. ते खाणे टाळले पाहिजे.


  5. बुफे
  जेवण बराच काळ ताजे राहावे यासाठी ते वारंवार गरम केले जाते. तसे केल्यास खाण्याचा स्वाद बदलतो आणि जेवण खरोखरच ताजे आहे की नाही हे कळत नाही. बुफेमध्ये प्रत्येक पदार्थासाठी वेगळा सर्व्हिंग स्पून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा प्रकारे विषाणू पसरण्यास प्रतिबंध केला जातो.


  6. विशेष मेनू
  अनेक रेस्तराँ "आजचा विशेष मेनू’ ठेवतात. बरेचदा अशा प्रकारचा मेनू सायंकाळपर्यंत एखादी डिश संपवण्यासाठी ठेवला जातो. डिश खरोखरच विशेष आहे की नाही याचा अंदाज करणे कठीण होते. रेस्तराँमध्ये विशेष डिश बहुधा ग्राहक येण्याआधीच तयार करून ठेवली जाते.

Trending