आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Family ला वेळ देण्यासाठी स्मार्टफोन जमा करणाऱ्या कुटुंबास हे रेस्तराँ देत आहेत मोफत जेवण, 250 हॉटेलमालकांची मोहिम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकी फॅमिली रेस्तरां चेन फ्रँकी व बेनीने रेस्तरांला शुक्रवारपासून 'नो फोन झोन' लागू केला आहे. रेस्तरांच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्ही कुटुंबीयांना वेळ देता यावा, म्हणून हा निर्णय घेतला आहे. या योजनेत मुलांसह आलेल्या पालकांना आपले फोन व टॅब्लेट रेस्तरांमध्ये जमा करावे लागतात. त्याऐवजी त्यांना मोफत जेवण द्यावे लागत आहे. सध्या ही ऑफर 9 डिसेंबरपर्यंत सर्व इटालियन-अमेरिकन साखळीतील 250 रेस्तरांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास तो वाढवला जाऊ शकतो. नुकतेच त्यांनी एक संशोधन पाहिले होते. यात पालक स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांना वेळ देत नाहीत, असे आढळून आले होते.


रेस्तरांच्या माहितीनुसार, 1500 लोकांवर झालेल्या संशोधनात पालकांनी सांगितले, जेवण करताना ते फोन पाहत असतात, तर 10 पैकी एका मुलाने म्हटले, आम्हाला त्यांनी वेळ द्यावा म्हणून जेवताना त्याने पालकांचा फोन लपवला होता. यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. मुलांचे कोच सुई अटंकिस यांनी सांगितले, रेस्तरांच्या निर्णयामुळे आम्ही खूप खुश आहोत. आजकाल आम्ही 24 तास डिजिटल जगात असतो. कुटुंबीयांसाठी वेळ कसा काढावा, याचा आम्हाला विचार करावा लागतो. जोपर्यंत आम्ही काही योजना आखत नाही, मुलांना वेळ देणे कठीण आहे.

बातम्या आणखी आहेत...