Britain / पुरुषांना सोफ्यावर आराम करताना, महिलांना काम करताना दाखवणाऱ्या, भेदभाव करणाऱ्या जाहिरातींवर बंदी

ब्रिटनच्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड््स अॅथॉरिटीचा निर्णय, बदलासाठी दिले ६ महिने

वृत्तसंस्था

Jun 18,2019 11:45:56 AM IST

लंडन - ब्रिटनमध्ये आता महिलांना काम करताना आणि पुरुषांना आराप करताना दाखवण्यास किंवा महिला कार पार्क करू शकत नसल्याचे दाखवणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. तज्ञांच्या मते, महिला आणि पुरुष समानतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.


ब्रिटनच्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स अॅथॉरिटीनुसार (एएसए) नवे नियम लागू झाल्यावर महिलांना व्यवस्थित ड्रायव्हिंग करता येत नाही असे दाखवणाऱ्या किंवा महिलांना साफसफाई करताना आणि पुरुषांना सोफ्यावर आराम करत असताना दाखवणाऱ्या जाहिराती कमी होतील. अशा प्रकार महिलांना कमी लेखणे किंवा त्यांची प्रतिमा खराब करणाऱ्या जाहिराती दाखवणे आता नियमाविरुद्ध मानले जाईल. एएसएने जाहिरातदारांना बदलासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला आहे. एएसएचे प्रमुख गाय पार्कर यांनी निवेदनात म्हटले आहे की, वेगवेगळ्या अभ्यासांतून असा निष्कर्ष निघाला आहे की, जाहिरातींत लैंगिक भेदभाव दाखवल्याने समाजात असमानता पसरू शकते, त्याची किंमत सर्वांना चुकवावी लागेल. सर्व जाहिरातींवर बंदी घालण्याची संस्थेची इच्छा नाही, पण ज्यांचा वाईट परिणाम होऊ शकतो, त्या तर रोखाव्याच लागतील. मुलांसाठी तयार केलेल्या जाहिराती उदा. मुले तर इंजिनीअरच होतील आणि मुली नृत्य चांगल्या करू शकतात अशी मानसिकता दाखवणेही स्वीकारार्ह होणार नाही. एका फॉर्म्युला मिल्कच्या जाहिरातीत तसे दाखवण्यात आले होते.

ऑनलाइन, सोशल मीडियावरही ही बंदी लागू होईल : एएसए

एएसएच्या मते, आजकाल लोक ऑनलाइन आणि सोशल मीडियावरही सारखेच सक्रिय असतात. त्यासाठी त्यांना या कक्षेत आणले आहे. संस्थेने जाहिरातदारांशीही याबाबत चर्चा केली आहे, त्यांची प्रतिक्रिया सकारात्मकच होती. त्यासाठी एएसएने महिला आणि पुरुषांच्या गटाला वेगवेगळ्या जाहिराती दाखवून विचारले होते की, त्यात दाखवलेल्या पुरुषांची आणि महिलांची भूमिका दाखवून तुम्हाला कसे वाटते? त्यावर काही पालकांनी मुलांच्या भविष्यावर टिप्पणी करणाऱ्या जाहिरातींवर आक्षेप घेत भेदभावाची गरज काय, असे म्हटले होते.

X
COMMENT